परभणी, (प्रतिनिधी) परभणी येथील आर. पी. हॉस्पिटलमध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून अत्याधुनिक 1.5 टेसला MRI युनिटचे उद्घाटन माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आ.डॉ.राहुल पाटील, मेडिकल कॉलेज व आर.पी. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आमिर तडवी, डॉ. दीपक कुबडे, डॉ. दैठणकर, डॉ.संतोष हारकळ,डॉ.शहाजी बोडखे,डॉ.तांबोळी, डॉ.फैज,डॉ.भीमराव कनकुटे,डॉ. बाबासाहेब गायकवाड,राहुल कांबळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.वेदप्रकाश पाटील म्हणाले, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात MRI सुविधा 1.5 टेसला MRI मशीन हे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान असून, यामुळे मेंदू, मणक्याचे आजार, सांधे, मांसपेशी आणि अवयवांशी संबंधित आजारांचे अचूक निदान शक्य होणार आहे.
आ.डॉ.पाटील म्हणाले, जनतेला आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे प्रथम प्राधान्य आहे.1.5 टेसला MRI आणि ट्रॉमा केअर युनिटच्या माध्यमातून रुग्णांना तातडीने आणि अचूक उपचार मिळतील.यावेळी स्वप्नील बोर्डे,गोपाळ सुकरे, अतुल लोंढे आणि शिवाजी जाधव यांनी परिश्रम घेतले.
*50 टक्के सुट मिळणार*
आर.पी.हॉस्पिटलचे अधिष्ठता डॉ.प्रमोद शिंदे यांनी सांगितले की सर्वसामान्य रुग्णांना परभणी शहरापेक्षा ५०% अत्यल्प दरात रुपये २४०० पासून उपलब्ध होणार असल्याने परभणी व परिसरातील रुग्णांनी नाव नोंदणी करावी. तसेच परिसरातील नागरिकांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. ही सेवा गंभीर रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे,आर.पी हॉस्पिटल येथे अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टर्स आणि प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध आहेत.