परभणी (प्रतिनिधी) मौजे पेडगाव येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी दि 10 जून रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आले आहे
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांक शहीद खान उपस्थित असणार आहेत. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे शिवसेनेचे नवनिर्वाचित लोकसभा अध्यक्ष परभणी धैर्यशील (राजू) कापसे पाटील तसेच शिवसेना जिल्हाध्यक्ष परभणी, आनंद भरोसे यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे . प्रमुख उपस्थिती म्हणून सोनल देशमुख शिवसेना जिल्हाप्रमुख पाथरी विधानसभा मुंजाभाऊ नाना टाकळकर शिवसेना महानगर अध्यक्ष परभणी नितेश देशमुख तसेच शिवसेना तालुकाप्रमुख परभणी माऊली कदम आर्वीकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विनोद लोहगावकर आदी उपस्थित राहणार आहेत.
सदरील कार्यक्रमात व्याख्याते म्हणून कवी डॉ. प्रा. अशोक पाठक लालबहादूर शास्त्री महाविद्यालय परतुर डॉ. सुरेश हिवाळे कविता सहशिक्षक नूतन विद्यालय सेलू हे असणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन उपजिल्हाप्रमुख शिवसेना ग्रामीण सुहास देशमुख यांनी केले असून या कार्यक्रमानंतर राजे मल्हार मित्र मंडळाच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे
सदरील कार्यक्रम रेणुका माता मंदिर सभागृह पेडगाव येथे आयोजित करण्यात आला आहे तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सुहास देशमुख उपजिल्हाप्रमुख शिवसेना परभणी ग्रामीण यांनी केले आहे