परभणी (प्रतिनिधी) मध्य आणि पश्चिम भारतातील सर्वांत मोठे माध्यम समूह असलेल्या नवभारत – नवराष्ट्र मीडिया समूहाच्या वतीने शुक्रवारी (दि.30) ‘मराठवाडा हेल्थ आयकॉन’ सन्मान सोहळा २०२५ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये करण्यात आले होते. मराठवाडा विभागातील वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि समाजासाठी प्रेरणास्थान ठरलेल्या काही निवडक डॉक्टरांचा सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी फुलंब्री मतदारसंघाच्या आ. अनुराधा चव्हाण, युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उन्मेष टाकळकर Evolution Vision या कंपनीच्या संचालिका गीता आचार्य, नवभारत वृत्तपत्र समूहाचे ग्रुप प्रेसिडेंट ए. श्रीनिवास, सरव्यवस्थापक कल्याण पांडे तसेच संपूर्ण मराठवाड्यातील असंख्य डॉक्टर उपस्थित होते.
या सोहळ्यात परभणी शहरातील पी.डी. जैन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.विजय दाभाडे, अस्थिरोग तज्ञ डॉ.नीलेश पवार आणि स्किन हेअर अँड लेसर क्लिनिकच्या संचालिका डॉ.रोहिणी सोनी यांनामराठवाडा हेल्थ आयकॉन सन्मान पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
परभणी येथे वसमत रोडवर अत्यंत अत्याधुनिक सोनीज् स्किन हेअर अँड लेसरचा अलीकडेच शुभारंभ झाला असून या क्लिनिकच्या संचालिका डॉ.सौ. रोहिणी अक्षय सोनी यांनी वैद्यकीय क्षेत्रातील B.H. M. S. ही पदवी परभणी येथील पि. डी. जैन होमिओपॅथीक महाविद्यालय येथून प्राप्त केली आहे. तसेच पुणे येथून त्यांनी PGDCC ही पदवीका प्राप्त करून आपल्या वैद्यकीय सेवेला नुकताच प्रारंभ केला आहे. मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा हेल्थ आयकॉन सन्मान स्वीकारला. यावेळी त्यांचे पती अक्षय सोनी यांच्या सह डॉक्टर्स मोठया संख्येने उपस्थित होते