परभणी, (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी, परभणी महानगरच्या वतीने “सेवा ज्योती यात्रा व विकसित भारत संकल्प सभा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता व्यंकटेश मंगल कार्यालय, एमआयडीसी परिसर, परभणी येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. सौ. मेघनादीदी बोर्डीकर या प्रमुख वक्त्या तथा मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून कार्यकर्ते व नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात राबविण्यात येत असलेल्या जनकल्याणकारी योजना, सेवा, सुशासन आणि विकसित भारताच्या संकल्पनेविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध संघटनात्मक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून आगामी पक्ष कार्यक्रमांबाबतही चर्चा करण्यात येणार आहे.
भाजपा परभणी महानगरचे जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांनी सर्व पदाधिकारी, आघाडी-मोर्चाचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
“सकल परभणीकरांनी सेवा ज्योती यात्रा व विकसित भारत संकल्प सभा कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकसित भारताच्या संकल्पनेला बळ द्यावे व कार्यक्रम यशस्वी करावा,” असे आवाहनही श्री. शिवाजी भरोसे यांनी केले आहे.


