परभणी (प्रतिनिधी) शहरातील बाल विद्यामंदिर हायस्कूल , नानल पेठ येथे आषाढी एकादशी निमित्ताने *वारी पंढरीची* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्री विठ्ठल रूख्माई व संतमेळा यांच्या सजीव देखाव्यांनी प्रेक्षकांची मने वेधली. प्रसंगी वारकरी, टाळकरी , मृदंग वादक यांच्यासह टाळ मृदंगाच्या नादात ज्ञानदेव तुकारामाच्या जयघोषात दिंडी संपन्न झाली. वारकरी झालेल्या विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या साह्याने पाऊली सादर केली.
सदरील कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डाॕ. एन. ए. झरकर , सचिव डॉ. विवेक नावंदर , उपाध्यक्ष ॲड. विलासराव पोहंडूळकर , सदस्या सौ. डॉ. अनिता विवेक नावंदर , मुख्याध्यापक अरूण बोराडे , उपमुख्याध्यापक रामदास तुम्मेवार , पर्यवेक्षक प्रदिप रूघे , बळीराम कोपरटकर आदी उपस्थित होते.
संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर म्हणाले की , वारी ही भक्तीची व श्रदधेची जशी आहे तशी ती श्रमाची व एकतेची प्रतिक आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांची मानवतेची , समतेची व एकात्मतेची शिकवणं या वारीतून रूजवण्याची परंपरा कायम टिकून आहे. आज आपल्या ज्ञानरूपी बाल विद्यामंदिर पंढरीच्या प्रांगणात साक्षात आध्यात्मिक पंढरी अवतरल्याचा अनुभव आला. ही संतांची शिकवण आपण आपल्या जीवनात अंगीकारली पाहिजे.
या कार्यक्रमाचे सादरीकरण इयत्ता आठवा फ च्या विद्यार्थ्यांनी केले . यांना वर्गशिक्षक सुभाष ढगे , अमित मोगल , शंकर शेळके व कलाशिक्षक केशव लगड यांचे मार्गदर्शन लाभले.


