परभणी (प्रतिनिधी) अंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष आणि नाबार्डच्या 44 व्या स्थापना दिनानिमित्त पुणे येथे आयोजित भव्य समारंभात मा. केंद्रीय अर्थराज्यमंत्री मुरलीधरराव मोहोळ यांच्या शुभहस्ते, दि. परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला “Best DCCB Overall Performance” हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्यंकटेश राजेश्वरराव कुरुंदकर आणि मंगेश फुलारी यांनी सन्मानपूर्वक स्वीकारला. यावेळी प्रवीण दराडे प्रधान सचिव महाराष्ट्र राज्य गोवर्धन रावत नाबार्ड मुख्य कार्यकारी संचालक मा दीपक तावरे सहकार आयुक्त वाडेकर अतिरिक्त सहकार आयुक्त व निबंधक महाराष्ट्र राज्य मा रश्मी दरड मुख्य सरव्यवस्थापक राजेश सुरवसे, सुनील जी नवसारे जिल्हा विकास अधिकारी नाबार्ड परभणी एन डी डी बीचे अध्यक्ष डॉक्टर व्ही श्रीधर एन ए एफ एस सी ओ बी चे अध्यक्ष के रवींद्रराव श्री अनास्कर प्रशासक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दिघे तसेच सहकार क्षेत्रातील सन्माननीय दिग्गज यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला
या गौरवाचे श्रेय बँकेच्या उत्तम कारभाराला, आर्थिक शिस्तीला, पारदर्शक व्यवस्थापनाला आणि ग्रामीण भागातील ग्राहकाभिमुख सेवा तत्त्वांना जाते. सहकार क्षेत्रात एक आदर्श उभारणाऱ्या परभणी जिल्हा बँकेच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्याला अभिमान वाटावा असा क्षण निर्माण झाला आहे. बँकेचे अध्यक्ष सुरेशराव अंबादासराव वरपुडकर उपाध्यक्ष राजेशभैया पाटील गोरेगावकर व सर्व सन्माननीय बँकेच्या संचालक मंडळाचे मार्गदर्शन, अधिकारी–कर्मचाऱ्यांचे परिश्रम व हितचिंतकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले आहे


