पालम (प्रतिनिधी) मुस्लिम समाजाचे अत्यंत महत्वपूर्ण असलेला पवित्र रमज़ान महिनात सर्व वयोवृद्ध पासुन ते चिमुकले उपवास ठेवत असतात या महिन्यात उपवासा सह नमाज, जकात, (दानधर्म) पवित्र कुराणाचे पठण करून मुस्लिम बांधव अल्लाह (ईश्वर) कड़े आपली श्रद्धा प्रगट करत असतात या रमज़ानच्या महिनात मुस्लिम समाजात भक्तिमय वातावरण राहते यात मोठ्या पासुन ते लहान पर्यंत सर्व जण रोजे (उपवास) धरत असतात अशात पालम जिल्हा परभणी येथील रहीवाशी व पालम सिटीजन्स पेपरचे संपादक शेख गौसोद्दीन यांचा मुलगा शेख सऊद शेख गौसोद्दीन वय ७ वर्ष यांनी आपल्या आयुष्यातला पहिला रोजा ठेवत अल्लाह (ईश्वर) प्रति आपली आस्था ठेवत सकाळी ५:२२ वाजता निहारी (सहेरी) करून दिवस…
Author: Lok Sanchar
परभणी,(प्रतिनिधी) : ऑल इंडिया टॅक्स फेडरेशनच्या (वेस्टर्न झोन) सहसचिवपदी येथील कर सल्लागार राजकुमार भांबरे यांची सलग दुसर्यांदा नियुक्ती झाली आहे. ऑल इंडिया टॅक्स फेडरेशनच्या (वेस्टर्न झोन) मॅनेजमेंट कमिटी मेंबरच्या निवडणुकीत राजकुमार शंकरराव भांबरे विजयी झाले होते. त्यानंतर 2024-25 साठी भांबरे यांची सहसचिवपदी निवड झाली. या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर 2025-26 साठी पार पडलेल्या निवड प्रक्रियेत भांबरे यांची मराठवाडा विभागातून सलग दुसर्यांदा या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी आभासी बैठकीद्वारे 2025-26 या वर्षासाठी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी सचिन गांधी (मुंबई), उपाध्यक्षपदी सीए अक्षय मोदी (गुजरात), उपाध्यक्षपदी अॅड. नरेंद्र सोनवणे (पुणे), सचिवपदी कैलास काशीद, कोषाध्यक्षपदी सुनील देशमुख (नाशिक), सहसचिवपदी राजकुमार भांबरे (परभणी),…
पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील पेठ शिवणी येथे मागील खूप दिवसापासून शासनाच्या दोन दोन पाणीपुरवठा योजना गावांमध्ये सुरू आहे 65 गाव नळ योजना व जल घर घर मिशन योजना पण अद्यापही गावाला पाणी मिळत नाही व त्या योजनेचे काम बोगस असल्याचे जनतेतून बोलले जात होते . याच पार्श्वभूमीवर आ.रत्नाकर गुट्टे यांनी पेठशिवणी येथे पाणीपुरवठा योजनेची केली पाहणी शासनाच्या लाखो रुपयांच्या योजना येत आहेत पण त्या फक्त कागदपत्रे असल्याचे दिसून येत आहेत आणि काही योजना आहेत त्यांचे काम व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येत आहे त्यासाठी गंगाखेड विधानसभाचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांनी स्वतः सर्व गावातील फिरून कामाची पाहणी केली व अधिकारी व या…
वसमत रोडवरील महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन परभणी, (प्रतिनिधी) : जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत अल्पसंख्याक समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेतला. तसेच या योजनांचा लाभ अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक पात्र व्यक्तीला देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जैन मंदिरांचे अध्यक्ष कांतिचंद गोलेच्छा, रुपेश साखला, राम मुथा, मंजुषा दर्डा, वीरकुमार सावजी, यांच्यासह सर्व अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित होते. राज्य शासनामार्फत अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ समाजातील अल्पसंख्याक घटकांपर्यंत पोहचवून त्यांच्या विकासाला गती देण्यासाठी प्रयत्न करावा, असे श्री. गांधी यावेळी म्हणाले. अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक…
परभणी, (प्रतिनिधी) : 1008 भगवान महावीर स्वामी यांचे 2550 निर्वाण वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये परभणी जिल्ह्यातील विजेत्या विद्यार्थ्यांना जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. खुशी सचिन मुथा, स्कॉटीश अकादमी, कल्याणी प्रेमसुख बोराळकर, श्रीमती शंकुतलाबाई बोर्डीकर कन्या विद्यालय जिंतूर, करण उधव गलबे, जि.प. प्राथमिक व माध्यमिक शाळा पाथरी, प्रगती परमेश्वर इंगळे, दुर्गा गजानन मगर, मानसी प्रेमसुख बोराळकर, श्री संचारेश्वर जिंतूर, सात्विक संतोष मेहत्रे, न्यू ओयासीस इंग्लिश स्कूल परभणी, अनुजा ग्यानोबा बोबडे, सुशांत मुंजाजी तरवटे, जि. प. प्राथमिक शाळा बोरवंड, संस्कृती विद्यानिकेतन प्रायमरी इं. स्कूल परभणी,…
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने… लहानपणापासूनच मला सिनेमा पाहण्याची आणि गाणे ऐकण्याची आवड आहे. नीले गगन के तले धरती का प्यार मिले, नीले नीले अंबर मे चांद जब आये, निळ्या आभाळी कातरवेळी… अशी अनेक निळ्या आकाशाची आणि निळ्या समुद्राच्या पाण्याची गाणी ऐकत आलो .पण, मला कधी प्रश्न पडला नाही की आकाशाचा रंग निळा का? किंवा समुद्राचं पाणी निळशार का? या सर्व प्रश्नाचे उत्तर आम्हाला मिळतं १९३० साली नोबल पुरस्कार प्राप्त केलेल्या सी.व्ही. रमण यांच्या शोधात. मुळात त्यांनी काही या दोन्ही प्रश्नाची उत्तरे प्रत्यक्ष दिली नाहीत तो काही त्यांच्या संशोधनाचा विषय नव्हता. सी.व्ही. रमण या भारतीय भौतिकशास्त्रज्ञाला १९३० मध्ये प्रकाशाच्या विखुरण्यावरील (Scattering…
परभणी (प्रतिनिधी)- तालुक्यातील मटकऱ्हाळा ते आनंदवाडी या रस्त्याचे कंत्राटदाराने अर्धवट सोडुन दिलेले काम तात्काळ सुरु करण्या बाबत. दि. ०९ जानेवारी २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देवुन काम सुरु न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या पत्रानंतर कंत्राटदाराने तात्काळ कामाची सुरुवात केली परंतु आठवडाभर काम केल्यानंतर कंत्राटदाराने परत काम थांबवले या बाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना वेळोवेळी पाठपुरावा करुनही काम सुरु होत नसल्याने आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी यांच्या कार्यालयावर झोपेत असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी डफली वजाव आंदोलन करण्यात आले तसेच कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकत्यांनी ठिय्या आंदोलन…
परभणी (प्रतिनिधी) परभणी जिल्हा काँग्रेस कमिटी कडून शहीद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मारेकऱ्यावर ३०२ चा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून घटनेची सीबीआय व उच्च न्यायालयीन चौकशी करावी व विधानसभेच्या अधिवेशनात परभणीच्या घटनेला न्याय द्यावा तसेच मागण्याचे निवेदन परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले. या निवेदनात परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची सोपान निवृत्ती पवार या इसमाने तोडफोड विटंबना केल्याची घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. यामुळे समस्त आंबेडकरी व संविधान प्रेमी समाजात असंतोष निर्माण झाला होता. दिनांक ११ डिसेंबर २०२४ रोजी परभणी बंदचे आवाहन करण्यात आले. या बंदला शहरातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला…
परभणी( प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस ‘शिवस्वराज्य सप्ताह’च्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परभणी येथे मा .आ .राजेशदादा विटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक २६ रोजी रयतेचे राज्य शिवरायांचे या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष जाधव सर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दीपक वारकरी, युवक तालुका अध्यक्ष पूर्णा सुनिल गोळेगावकर, आनंद बायास, माधव वजीर.काळे सर तसेच संस्थेचे सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
परभणी (प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे याही वर्षी साजरी होणाऱ्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गौतम नगर येथील सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निलेश गायकवाड यांची आज दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्या निमित्ताने सर्व समाज बांधवांच्या वतीने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले व अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निलेश गायकवाड यांचा भव्य सत्कार करण्यात आला. ही निवड गौतम नगर येथील विहारात बैठक घेऊन घेण्यात आली असून त्या वेळी बौद्ध समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ( छाया संजय घोणस8)