पँथर परिवर्तन चळवळचे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
परभणी (प्रतिनिधी) येथील प्रभाग क्रमांक 7 येथे कचराकुंडीचे जागोजागी ढीग जमले आहेत. रोगराई पसरण्याची भीती नागरिकांमध्ये झाली आहे. पॅंथर परिवर्तन चळवळीचे संस्थापक अध्यक्ष यांनी महानगरपालिका उपायुक्त यांच्या मार्फत आयुक्तांना स्वच्छतेबाबत निवेदन दिले आहे.

तात्काळ प्रभाग क्रमांक 7 येथील साई कॉर्नर, खंडोबा बाजार रोड, कौसर हॉस्पिटल सुफा मज्जिद जवळ तसेच मराठवाडा प्लॉट येथे घाणीचे साम्राज्य वाढले आहे. तात्काळ याकडे लक्ष देऊन स्वच्छता करण्यात यावी. अन्यथा येत्या काही दिवसात नागरिकांसह महानगरपालिकेवर जना आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा पॅंथर परिवर्तन संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ पानबुडे यांनी दिला. निवेदनात शुभम माने, विनायक शिंदे, सुमित लोहिया, राम पारखे, गोविंद पारखे, सागर पानबुडे, संतोष टिकुळे, दिनेश कुरील, सुभाष कुरील, नसीर हुसेन, बोधिसत्व साळवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


