परभणी (प्रतिनिधी) भारतीय बौध्द महासभा व वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा परभणीच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 12 मार्च रोजी भव्य अशा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाची सुरुवात सकाळी ठिक 11 वाजता म. फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन सुरुवात करण्यात आली. म. फुले यांच्या पुतळ्यापासुन डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करण्यात आला. भंते पी. धम्मानंदजी यांनी ञिसरण पंचशील दिले. सदरील मोर्चात बुध्दगया येथील महाबोधि महाविहार व्यवस्थापणाचा 1949 चा कायदा रद्द करुन विहार बौध्द भिक्कुच्या ताब्यात देण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यावेळी भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनिताताई साळवे, वंचित…
Author: Lok Sanchar
शांतता समितीची बैठक संपन परभणी, (प्रतिनिधी) : येत्या शुक्रवारी होळी व आगामी रमजान ईद सणानिमित्त शहरात विविध जाती-धर्मांमध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा राखावा तसेच दोन्ही सण शांततेत व आनंदात साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हावासियांना केले. होळी व रमजान ईद हे सण शांततेत आणि साध्या पद्धतीने पार पाडण्यासाठी जिल्हा शांतता समिती व विभागप्रमुखांची बैठक आज जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त़्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डी. एस. डंबाळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्ह्यात…
परभणी(प्रतिनिधी) संविधान प्रतिकृती शिल्प बसविण्याच्या मागणीसाठी कचरूदादा गोडबोले यांनी उपोषण सुरू केले होते.या उपोषणाची दाखल घेऊन महानगर पालिका आयुक्त धर्याशील जाधव यांनी आज मनपात उपोषणार्थीसह आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.सदरील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. मार्च महिन्याच्या अखेरीस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर नवीन संविधान प्रतिकृती शिल्प बसवून भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन पालकमंत्री यांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा घेण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा सुरू असल्याचे मनपा आयुक्त धर्याधील जाधव यांनी बैठकीत सांगितले. १० डिसेंबर रोजी संविधान प्रतिकृती शिल्प विटंबनेच्या घटनेला तीन महिने होत आहेत. भारतीय संविधान म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर ही अस्मिता असल्यामुळे कचरूदादा गोडबोले यांनी जिल्हा प्रशासनाला वारंवार…
परभणी,(प्रतिनिधी) : आजच्या काळात संवेदनशील मन तयार करणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पद्मश्री मोहन आगाशे यांनी केले. परभणी येथील सायन्स पार्क येथे आयोजित 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात गोल्डन लोटस पुरस्कार विजेता ‘कासव’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंग प्रसंगी त्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. कार्यक्रमात प्रारंभी उपस्थित प्रेक्षकांनी कासव हा चित्रपट पाहिला व त्यानंतर कलावंत मोहन आगाशे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर प्रा. ज्ञानोबा नाईक, डॉ. अमोल देशमुख, डॉ. जगदीश नाईक यांची उपस्थिती होती. यावेळी आगाशे यांनी मानवी भावना, मन याबाबत चित्रपटातील अंतर्मुख करणार्या बाबींवर प्रकाश टाकला. भावना शब्दाच्या पलीकडच्या आहेत. पूर्वी अनुभवातून शिक्षण मिळायचे व नंतर माहिती मिळायची…
परभणी,(प्रतिनिधी) : महानगरपालिका हद्दीतील गणेश नगर परिसरातील महात्मा फुले विद्यालया समोरील तीन अतिक्रमणे महापालिकेच्या एका पथकाने मंगळवारी (दि.11) जमीनदोस्त केली. महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमणाच्या विरोधात मोहिम सुरु केली. प्रशासकीय इमारतीच्या संरक्षण भिंती लगतचे अतिक्रमण सोशल मिडीयातून गाजल्याबरोबर महापालिका प्रशासनाने हटवले. त्या पाठोपाठ मंगळवारी फुले विद्यालयाच्या समोरील मनपाच्या खूल्या जागेवरील तीन अतिक्रमणे जमीनदोस्त केली. सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने त्या स्थळी ताफ्यानिशी दाखल झाल्याबरोबर अतिक्रमणकर्त्यांनी अतिक्रमण काढण्यात विरोध केला, मात्र नियमानुसार मोजणी करुनच अतिक्रमण काढले जातील, असे या पथकाने स्पष्ट केल्यानंतर जागेची मोजणी केली व मार्कींग करुन अतिक्रमणे काढण्यात आली. शाखा अभियंता राहुल धुतडे, कर अधिक्षक जुबेर हाशमी, नगर…
परभणी,(प्रतिनिधी) : परभणी शहरातील 10 वर्षीय अल्पवयीन बालीकेवर 23 फेबु्रवारी रोजी नराधमाने केलेल्या बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी (दि.10) येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर संतप्त हजारो महिलांसह नागरीकांनी मोठा निषेध मोर्चा काढला. येथील लहुजी नगरातून या मोर्चास प्रारंभ झाला. मोठा मारोती मंदिर, शाही मस्जिद, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा तेथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात हा मोर्चा दाखल झाला. मोर्चातील संतप्त हजारो महिलांसह नागरीकांनी काळे झेंडे फडकवले. तर कपाळास काळ्या पट्या लावल्या. काही मोर्चेकर्यांनी हातात फलके झळकावून पोलिस प्रशासनाचा धिक्कार केला. तसेच नराधमास फाशीची शिक्षा द्या, आरोपींची नार्को टेस्ट करा, बालिका अत्याचाराचा निषेध असो, फास्ट्रॅक कोर्टात खटला चालवा यासह विविध आशयांचे,…
परभणी,(प्रतिनिधी) : येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान व विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. किरण सोनटक्के तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. गंगाबाई सोनटक्के, प्रा. सौ. शितल सोनटक्के, जिल्हा क्रिडा अधिकारी सौ. कविता नावंदे, महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांच्यासह सर्व विभागाचे समन्वयक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. सौ. सोनटक्के यांनी जिथे महिलांचा सन्मान होतो तिथे लक्ष्मीचा वास असतो, असे सांगितले. सद्य परिस्थितीत स्त्रियांचे सक्षमीकरण व सबलीकरण याचे महत्त्व…
पालम (प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्रशाला या ठिकाणी सर्व वर्षे 1984 सर्व वर्ग मित्र एकत्र आले आणि कार्यक्रम फार मोठ्या थाटामाटात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आम्हाला शिकवणारे गुरुजन सु वा कुलकर्णी सौ कुलकर्णी आणि जावळे सर होते पुढे हे सर्व वर्गमित्र व शिक्षक झाले काही इंजिनिअर झाले तर काही उद्योग करू लागले आणि आपल्यापासून दूर झाले त्यामुळेच गेट-टुगेदर कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले 9 मार्च 2025 रविवार या दिवशी श्री दत्तकृपा लंच होम गंगाखेड रोड पालम येथे सर्व मित्रांच्या भेटीगाठी झाल्या आपण पूर्वी कसे होतो आता कसे झालो या प्रकारचा सर्वांनी आपला लेखाजोखा यामध्ये मांडला आणि बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला…
परभणी (प्रतिनिधी) बुधवार दि. 12 मार्च रोजी महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत कान्हेकर हॉस्पिटल, शास्त्री नगर परभणी येथे तज्ञ डॉक्टर डॉ मिलिंद कान्हेकर MBBS MS ( पोटाचे विकार तज्ञ) डॉ मनिषा कान्हेकर MBBS DGO( स्त्री रोग विशेषज्ञ) हे रुग्णाची तपासणी करणार आहेत. शिबिरात तपासणी झालेल्या रुग्णांची दुर्बिणीद्वारे पचन संस्था व अन्न नलिकाची 50% सवलतीत तपासणी करण्यात येणार आहे. तसेच पोटदुखी, पोट फुगणे, अपचन, मळमळ, उलटी यावर निदान आणि उपचार, मूळव्याध निदान आणि उपचार, मूत्ररोग निदान आणि उपचार , डे केस सर्जरी सवलतीत, गॅस्ट्रोस्कोपी, लॅपरोस्कोपी , कोलोनोस्कोपी माफक…
परभणी ( प्रतिनिधी)आज दि. ०८ मार्च जागतिक महिला दिन आजच्या दिवशी कर्तव्य करणा-या महिलांच्या सन्मान करण्याचा हा दिवस या निमित्याने पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शन व संकल्पनेतुन जिल्हयातील पोलीस स्टेशन स्तरावर विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आज रोजी पोलीस स्टेशन नानलपेठ येथे पुर्ण दिवस हा महिला पोलीस स्टेशन म्हणुन साजरा करण्यात आला. त्यामध्ये पोलीस स्टेशन नानलपेठ चे प्रभारी अधिकारी म्हणुन महिला पोलीस उप निरीक्षक श्रीमती स्वाती कावळे, ठाणे अंमलदार कर्तव्यावर महिला पोलीस अंमलदार करुणा मालसमिन्दर, स्वागत कक्ष अधिकारी म्हणुन म.पो.अं. शामल धुरी, क्राईम राईटर म्हणुन म.पो.अं. शेख निशाद, गोपनिय शाखेचे प्रभारी म्हणुन म.पो.अं.सुनंदा साबणे,…