परभणी,(प्रतिनिधी) : येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचलित रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान व विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. किरण सोनटक्के तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. गंगाबाई सोनटक्के, प्रा. सौ. शितल सोनटक्के, जिल्हा क्रिडा अधिकारी सौ. कविता नावंदे, महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांच्यासह सर्व विभागाचे समन्वयक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. सौ. सोनटक्के यांनी जिथे महिलांचा सन्मान होतो तिथे लक्ष्मीचा वास असतो, असे सांगितले. सद्य परिस्थितीत स्त्रियांचे सक्षमीकरण व सबलीकरण याचे महत्त्व सांगत एक नारी सबसे भारी असे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुण्या जिल्हा क्रीडा अधिकारी सौ. नावंदे यांनी शालेय जीवनात खेळाचे महत्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच महिला व बालविकास अधिकारी तिडके यांनी महिला सक्षमीकरण व बालविवाह प्रतिबंध याविषयी विद्यार्थ्याना विशेष मार्गदर्शन केले.
याप्रसंगी क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, शिष्यवृत्ती सराव परीक्षा या सर्व स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे पालका समवेत बक्षीस देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. संस्थेतील कार्यरत सर्व महिला कर्मचार्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी इयत्ता 5वी गटातून सर्वप्रथम-चि. अर्णव सचिन देशमुख, द्वितीय-कु.लोहट आनंदी शरद, तृतीय – कु.फुलपगार गायत्री गजानन तसेच इयत्ता 8 वी गटातून सर्वप्रथम – चि. बेले सत्यम बालासाहेब, द्वितीय – चि.खैरे आदित्य प्रताप, व चि.श्रुत पंकज तयरल, तृतीय – कु. रोडगे मोहिनी सुरेंद्र या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रथम पारितोषिक टॅब, द्वितीय पारितोषिक 5000 रु., तृतीय पारितोषिक 3000रु. देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच आयुष्यावर बोलू काही…! वार्षिक स्नेहसंमेलन- 2024 मध्ये ‘बळीराजा सन्मान योजना’ या विभागाने बळीराजा-जगाचा पोशिंदा या थिमवर उत्कृष्ट अभिनयासह उत्तम सादरीकरण केल्यामुळे संस्थेच्या वतीने 1 लाख रुपयाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणार्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.तसेच क्रीडा स्पर्धेतील सर्व क्रीडा प्रकारातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्रा. किरण सोनटक्के यांनी महिला सक्षमीकरण व सबलीकरण याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ.धुळे एस.डी. यांनी केले. तर उपस्थितांचे आभार जोशी एम.जे. यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले.
Saturday, July 19
ताज्या बातम्या:
- निवडणूक कालावधीत उत्कृष्ट वार्तांकन केलेल्या पत्रकारांचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते सन्मान
- कृषि पंप योजनेवरुन सरकारला धरले धारेवर ; आ.डॉ.राहुल पाटील विधानसभेत आक्रमक-लक्षवेधीद्वारे वीज समस्यांकडे वेधले सरकारचे लक्ष
- संबर येथील अपहरण आणि खून प्रकरणातील पाच आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हा शाखा व परभणी ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई
- उद्यापासूनच जिल्ह्यातील कॅनॉल व माजलगाव धरणात पाणी सुटणार; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बैठकीत माहिती
- पालकाच्या मृत्यूप्रकरणात निवेदन सादर करा; आ.डॉ राहुल पाटील यांच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांच्या सूचना
- भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांचा मदतीचा हात; ह.भ.प. जगन्नाथ महाराज हेंडगे मृत्यू प्रकरणातील पीडित कुटुंबास दोन लाखांची आर्थिक मदत
- जायकवाडी डाव्या कालव्या मार्फत शेतीसाठी पाणी सोडावे युवक काँग्रेसची मागणी
- आ राजेश विटेकर यांनी विधान सभेत उपस्थित केलेल्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन वर कार्यवाही