परभणी(प्रतिनिधी) संविधान प्रतिकृती शिल्प बसविण्याच्या मागणीसाठी कचरूदादा गोडबोले यांनी उपोषण सुरू केले होते.या उपोषणाची दाखल घेऊन महानगर पालिका आयुक्त धर्याशील जाधव यांनी आज मनपात उपोषणार्थीसह आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.सदरील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.
मार्च महिन्याच्या अखेरीस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर नवीन संविधान प्रतिकृती शिल्प बसवून भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन पालकमंत्री यांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा घेण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा सुरू असल्याचे मनपा आयुक्त धर्याधील जाधव यांनी बैठकीत सांगितले.
१० डिसेंबर रोजी संविधान प्रतिकृती शिल्प विटंबनेच्या घटनेला तीन महिने होत आहेत. भारतीय संविधान म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर ही अस्मिता असल्यामुळे कचरूदादा गोडबोले यांनी जिल्हा प्रशासनाला वारंवार निवेदने दिली होती प्रशासन दखल घेत नसल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबिला होता. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी महानगरपालिकेच्या लेखी पत्रावर उपोषण स्थगित केले होते. या संदर्भात आज उपोषणार्थी आणि आंबेडकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयुक्तांनी बोलावली होती. शिष्टमंडळाने आयुक्तांच्या समोर काही सूचना ही मांडल्या त्या सर्व सुचना विषयी मनपा प्रशासन सकारात्मक असून गांभीर्याने त्या पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या भवती संरक्षक भिंती लगत सध्याचे स्टील खांब काढून डिझाईन चे लोखंडी खांब बसवणे, हौदात कायम स्वरुपी पाणी ठेवण्यासाठी खंडित केलेली पाईप लाईन दुसृती करून जोडणे, संविधान शिल्प स्टॅण्ड ची उंची वाढवून फायवर काचेच्या बॉक्स मध्ये ठेवणे,आदी विषयावर चर्चा झाली. पुतळा समिती व त्या अनुषंगाने शासनाचे नियमाचे पालन करून या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या सोबत विचारविनिमय करून लकरच संविधान प्रतिकृती शिल्प बसवण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त धर्यशील जाधव यांनी बोलावलेल्या बैठकीत सांगितले.
या बैठकीस कचरू गोडबोले, संजय बगाटे, पंडित टोमके, धोंडीराज खेडकर, महेंद्र सानके, भूषण मोरे, निवृत्ती वाघमारे, अरुण गायकवाड, बाळासाहेब गोडबोले, सचिन कांबळे आदी उपस्थित होते. (छाया संजय घनसावंत(