पालम (प्रतिनिधी ) जिल्हा परिषद प्रशाला या ठिकाणी सर्व वर्षे 1984 सर्व वर्ग मित्र एकत्र आले आणि कार्यक्रम फार मोठ्या थाटामाटात संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आम्हाला शिकवणारे गुरुजन सु वा कुलकर्णी सौ कुलकर्णी आणि जावळे सर होते पुढे हे सर्व वर्गमित्र व शिक्षक झाले काही इंजिनिअर झाले तर काही उद्योग करू लागले आणि आपल्यापासून दूर झाले त्यामुळेच गेट-टुगेदर कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले
9 मार्च 2025 रविवार या दिवशी श्री दत्तकृपा लंच होम गंगाखेड रोड पालम येथे सर्व मित्रांच्या भेटीगाठी झाल्या आपण पूर्वी कसे होतो आता कसे झालो या प्रकारचा सर्वांनी आपला लेखाजोखा यामध्ये मांडला आणि बालपणाच्या आठवणींना उजाळा दिला सर्वांनी हसी मजाक मध्ये आपला स्वतःचा परिचय करून दिला यापुढे आपण एकमेकांच्या अडीअडचणीमध्ये धावून येऊ अशा प्रकारचे आश्वासन दिले पैशाला महत्त्वाचा नाही तर यापुढे आपल्या तब्येतीला जपले पाहिजे व्यसनाधीन होऊ नका आपले शेवटचे जीवन चांगले असू द्यावे निरोगी राहावे प्रकारचा संदेश आमच्या गुरुजनांना दिलेला आहे यामध्ये आमच्या पाच वर्गमैत्रिणी सुद्धा उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे प्रस्ताविक हनुमंत शिवणकर यांनी केले तर सूत्रसंचालन सुभाष शेंगोळे यांनी केले आहे आभार प्रदर्शन नामदेव दुधाटे यांनी केले तन-मन घराणे सर्व मित्रमंडळींनी मदत केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानले आहे
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामराव रोकडे, मनोरंजन दुधाटे गोळेगावकर, पांडुरंग रुद्रवार, प्रकाश दुधाटे,
शांतीलाल शर्मा, नारायण दुधाटे, सुभाष शेंगोळे, साहेबराव दुधाटे, विश्वनाथ पवार, हनुमंत शिवनगर, चंद्रकांत लोखंडे, दिगंबर नारलेवार अनेक मित्रांनी आणि मैत्रिणीणी मदत करून कार्यक्रम चांगल्या प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला