परभणी (प्रतिनिधी) भारतीय बौध्द महासभा व वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा परभणीच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 12 मार्च रोजी भव्य अशा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
या मोर्चाची सुरुवात सकाळी ठिक 11 वाजता म. फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन सुरुवात करण्यात आली. म. फुले यांच्या पुतळ्यापासुन डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पन करण्यात आला. भंते पी. धम्मानंदजी यांनी ञिसरण पंचशील दिले. सदरील मोर्चात बुध्दगया येथील महाबोधि महाविहार व्यवस्थापणाचा 1949 चा कायदा रद्द करुन विहार बौध्द भिक्कुच्या ताब्यात देण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली. यावेळी भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कांबळे, वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुनिताताई साळवे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मगरे यांनी मोर्चास संबोधीत करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
यावेळी भारतीय बौध्द महासभेचे महाराष्ट्र राज्य सचिव बाबासाहेब धबाले, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुकाराम भारती, युवा जिल्हाध्यक्ष गणेश गाडे, तुषार गायकवाड, अविनाश सावंत, प्रमोद कुटे, समीर भुजबळ, धम्पापाल सोनटक्के, विश्वनाथ झोडपे, प्रमोद अंबोरे,ॲड. गौरव कुमार, यशवंत सोनवणे, आनंदा भेरजे, व्ही. व्ही. वाघमारे, शामराव जोगदंड, नरेद्र सोनुले, सुनिल पवार, एस. एस. साळवे, शिवाजीराव वाव्हळे, दशरथ गायकवाड, नागसेन हत्तीअंबीरे , एम. एम. बरे, पंडितराव पारवे, लक्षमण गायकवाड, एन जी. गोधम, रामचंद्र रोडे, राहुल कोसे, लताताई एंगडे, राहुल कचरे, नामदेव ढेपे, अतुल वैराट , राजकुमार एंगडे यांच्यासह परभणी जिल्यांमधुन सर्व तालुक्यामधुन महिला व पुरुष मोठ्या संखेने उपस्थितीत होते.