परभणी (प्रतिनिधी) बाल विद्या मंदिर हायस्कूल वैभव नगर शाखेत आज दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.बाल विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. श्री.एन.ए. झरकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी बाल विद्यामंदिर हायस्कूलचे पर्यवेक्षक तथा विभाग प्रमुख श्री.प्रदीप.रुघेसर,प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी,पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते.याप्रसंगी प्रशालेच्या संगीत विभागाने संगीत शिक्षक श्री.रमाकांत पैंजणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राज्यगीत, शालेय परिपाठ उत्तुंग स्वरात सादर केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भितीपत्रकांचे मान्यवरांच्या शुभहस्ते विमोचन करण्यात आले.या शुभप्रसंगी विद्यार्थ्यांचे वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी हिंदवी यादव आशिष खुपसे आणि आनघा यादव यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाप्रती आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी शालेय परिपाठातून समाजासाठी आणि देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा घ्यावी असे मार्गदर्शन केले.श्री. प्रदीप रुघे सर यांनी त्यांच्या भाषणात म्हणाले की, राष्ट्रगीत राज्यगीत आणि देशभक्तीपर गीतांमधून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीचे मूल्य रुजवले जाते .स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून विध्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेतून तिरंगा राखी आणि तिरंगा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्याचे उदघाटन मा. डॉ. श्री नंदकुमार झरकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले, त्यांनी सर्व विध्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले.स्पर्धेच्या सुंदर आयोजनाबद्दल कीर्ती आलेगावकर मॅडम, भावना गुडेवार मॅडम, अरुणा कंधारकर रेश्मा देशमुख अर्चना हाके,चंदन पैंजने ,व पर्डेकर यांचे तसेच क्रीडाशिक्षक श्री प्रभाकर गमे यांचे सुद्धा अभिनंदन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.एस.एम.उखळकर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.अजित देशपांडे यांनी केले.सर्व शिक्षकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
Sunday, February 8
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


