परभणी,(प्रतिनिधी) यशस्विनी महिला मंचच्या वतीने शहरातील श्री मंगल कार्यालय येथे दिनांक 27 जुलै रोजी दुपारी दोन ते चार या वेळेत खुली मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती यशस्विनी महिला मंच अध्यक्ष डॉ.संप्रिया राहुल पाटील यांनी दिली.
यशस्विनी महिला मंचच्या वतीने सातत्याने महिलांसाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात येतात. आता मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असणार आहे.यशस्विनी महिला मंचचे सदस्य आणि एक खुला गट अशा दोन गटात स्पर्धा होणार आहे.मंचच्या सदस्यांसाठी सहा विजेते घोषित केले जाणार आहेत.पहिल्या आलेल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय,तृतीय अशी पारितोषिक देण्यात येतील आणि तीन उत्तेजनार्थ पारितोषिक दिली जातील. खुल्या ग्रुपच्या सदस्यांना तीन आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.,या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी कुठलीही फिस आकारण्यात आली नसून मोफत सहभाग घेता येणार आहे. स्पर्धकांनी ठीक दीड वाजता श्री मंगल कार्यालय,स्टेशन रोड,परभणी येथे उपस्थित राहावे लागणार आहे. स्पर्धकांनी आपला मेहंदी कोण घेऊन येणे आवश्यक आहे, आयोजक हे मेहंदी कोण पुरवणार नाहीत, स्पर्धेचा वेळ 45 मिनिट असून पेपर वरती आपण डिझाईन बनवू शकणार नाहीत.आपण स्वतःच्या हातावरती मेहंदी काढू शकतात अथवा आपण पार्टनर आणून त्यांच्या हातावरती मेहंदी काढू शकतात. अंतिम निर्णय हा फक्त परिक्षकांचा असणार आहे.आपण घड्याळ घालतो तो भाग म्हणजे मनगटाच्या थोडासा खाली इथपर्यंत आपल्याला डिझाईन काढायची आहे, नाव नोंदणी बंधनकारक आहे.त्यासाठी आ.डॉ.राहुल पाटील यांचे शिवाजी नगर येथील तोरणा निवास संपर्क कार्यालयात कृष्णा शिंदे मो.नं.8080921914 यांच्याकडे दि.26 जुलै रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत नोंदणी करावी.या स्पर्धेत मोठ्या संख्यने महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन डॉ.संप्रिया पाटील यांनी केले आहे.


