परभणी, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधान परिषद परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान गुरुवार, दि. १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात आलेले ओळखपत्र अथवा भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या पुराव्यांपैकी एक पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे. मतदानासाठी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील महसूल उपविभागांच्या ठिकाणी एकूण सात मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. मतदान केंद्राचे ठिकाण व मतदान केंद्रात जोडण्यात आलेल्या स्थानिक प्राधिकरणाचे नाव आणि मतदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. तहसीलदार कार्यालय, परभणी येथे जिल्हा परिषद परभणी (सर्व पंचायत समिती सभापतींसह) व शहर महानगरपालिकेच्या सदस्यांसाठी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले…
Author: Lok Sanchar
परभणी, (प्रतिनिधी) विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होत असून, मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी मतदान साहित्य घेऊन आज संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाले. यावेळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी मतदान पथकांच्या वाहनांना हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक साहित्य, मनुष्यबळ व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ***
सेलू ( प्रतिनिधी) माणसाला दैनंदिन जीवनात पडणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे श्रीमद् भागवतात आहेत. भागवत हे सर्व सांसारिक लोकांकरिता आहे. भक्ती ही मोह,शोक मुक्तीच माध्यम आहे. आजच्या युगात भक्तिसारखा दुसरा योग्य मार्ग नाही. भक्तिमार्गानेच माणसाचे परमकल्याण होते. सर्व प्रकारचे आचार,कर्म भगवंताला अर्पण करणे म्हणजे भक्ती. भक्तीने मन स्वच्छ, प्रसन्न होते.असे प्रतिपादन वे.शा.सं.ह.भ.प.पद्मनाभ महाराज व्यास ( धाराशिव) यांनी केले. कुलकर्णी परिवाराच्या वतीने पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आयोजित श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाचे दुसरे पुष्प पद्मनाभ महाराज व्यास यांनी रविवार ( दि.१४ ) रोजी शहरातील ‘भक्तितीर्थ’ साई मंदिरात गुंफले. पुढे बोलताना पद्मनाभ महाराज व्यास म्हणाले की,” “श्रोता हा विवेकवान असला तरच वक्ता जबाबदारीने अभ्यासपूर्वक बोलतो.…
परभणी, ( प्रतिनिधी) – चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, पालकांच्या डोळ्यातील समाधान आणि स्वागतासाठी सजलेली शाळा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात मानवत येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात प्रवेशोत्सवाने करण्यात आली. आज शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता पहिलीतील नवीन प्रवेशित विद्यार्थी व पालकांचे गुलाब पुष्प, शैक्षणिक साहित्य आणि खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती वैशाली पंकजराव आंबेगावकर, मानवत नगर परिषदेच्या नगराध्यक्षा राणी अंकुश लाड, नगरसेवक मोहनराव लाड, मुख्याधिकारी कोमल सावरे, पंचायत समितीचे उपसभापती सुरजभैय्या काकडे, सदस्य श्री. शिंदे तसेच शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा राणीताई गोलाईत, उपाध्यक्ष विलास बारहाते, सदस्य श्रीराम पकवाने,…
परभणी ( प्रतिनिधी) तालुक्यातील मोजे पोरजवळा येथे दोन दिवसांपूर्वी रात्री नवु वाजता आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शिवारातील शेतकरी अनुसयाबाई वसंतराव लोखंडे यांच्या शेतातील सोलार पंपाच्या पाटीचे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्याचे सोलार बंद पडले आहेत अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पोर जवळ परिसरात हाहाकार माजला वाऱ्यामुळे अनेकांच्या शेतात लावलेले पत्रे तसेच सौर पंप चे मोठे नुकसान झाले झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे तर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे
परभणी, ( प्रतिनिधी) दि. १५ जून २०२६ : तालुक्यातील मौजे टाकळी (कुंभकर्ण) येथील सन १९९० पासून प्रलंबित असलेले प्लॉट फेरफार प्रकरण अखेर निकाली निघाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तब्बल ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला न्याय मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण, उपविभागीय अधिकारी श्री. उदयसिंह भोसले तसेच महसूल प्रशासनाचे आभार व्यक्त केले. ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण यांनी संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार उपविभागीय अधिकारी श्री. उदयसिंह भोसले यांनी विशेष बैठक घेऊन ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले व प्रकरण निकाली काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली. तहसीलदार डॉ. संदीप…
सेलू, ( प्रतिनिधी) : श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या वतीने सॅनरो नॉलेज सिटी, रवळगाव रोड, सेलू येथे “PRINCE Infotainment Park” हा बहुकोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात असून, हा प्रकल्प मराठवाड्यातील विद्यार्थी, पालक आणि पर्यटकांसाठी शिक्षण व मनोरंजनाचे नवे पर्व ठरणार आहे. “Ultimate Destination for Learning & Fun” या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प सन २०२६ च्या उत्तरार्धात नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेले हे इन्फोटेंटमेंट पार्क विज्ञान, क्रीडा, निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडविणारे मराठवाड्यातील पहिले विज्ञान-पर्यटन केंद्र ठरणार आहे. या पार्कमध्ये Curiosity SIAC (Science Innovation & Activity Centre), ऑलिम्पिक…
परभणी ( प्रतिनिधी) कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प स्मार्ट पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधी करिता क्षमता विकास या प्रकल्प अंतर्गत पाच दिवसीय, पशुखाद्य व चारा प्रक्रिया प्रशिक्षण पशुवैद्यकीय महाविद्यालयात आज दिनांक 15 जून 2026 रोजी सुरू झाले. पाच दिवस चालणाऱ्या या निवासी प्रशिक्षणाचे उद्घाटन माननीय डॉ. जगन सोळंके , सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग, परभणी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्राणेश येवतीकर हे होते. प्रारंभी प्रास्ताविक प्रकल्प सह समन्वयक डॉ. सुनित वानखेडे यांनी केले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना सहाय्यक आयुक्त डॉ. सोळुंके यांनी…
परभणी,(प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची गेली बारा वर्षे ही विश्वास, विकास आणि जनकल्याणाची यशस्वी वाटचाल ठरली असून आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी अनेक ऐतिहासिक निर्णय व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याच्या आरोग्य व ऊर्जा राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले. केंद्रातील मोदी सरकारच्या 2014 ते 2026 या बारा वर्षांच्या कार्यकाळाचा आढावा घेण्यासाठी शनिवार 13 जून रोजी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, रामकिशन रौंदळे, सुभाष कदम, रंजीत मोरे, राजेश देशमुख, डॉ. केदार खटिंग, मुकिंद खिल्लारे, अजय चव्हाण, आकाश लोहट, भारत जाधव, देवराव कर्हाळे…
सेलू,(प्रतिनिधी) : तालुक्यात अवैधरित्या वाळूची वाहतूक करणार्या ट्रॅक्टरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सकाळी धडक कारवाई करत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळूसह एकूण 3 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मिळालेल्या माहितीनुसार, दूधना नदीपात्रातून शासनाचा महसूल बुडविण्याच्या उद्देशाने अवैधरीत्या वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार शनिवारी सकाळी सुमारे 9 वाजता शहरातील समर्थ जिनिंग परिसरात सापळा रचून संबंधित वाहन ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान गोविंद शेवाळे यांच्या मालकीचा विनानंबर ट्रॅक्टर, ट्रॉली आणि त्यामधील वाळू असा एकूण 3 लाख 84 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक…

