परभणी,(प्रतिनिधी) : महिलांच्या खर्या अर्थाने सशक्तीकरणासाठी ठोस धोरणे आवश्यक असल्याचे मत खासदार डॉ. श्रीमती फौजिया खान यांनी राज्यसभेत व्यक्त केले.
केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या कार्यपध्दतीवर कठोर टीका करतेवेळी श्रीमती खान यांनी महिलांच्या सक्षमीकरणाच्या केवळ घोषणाबाजीवरच सरकार भर देत आहे. प्रत्यक्षात महिलांचे आरोग्य आणि पोषणाच्या बाबतीत मूलभूत सुधारणा होत नाहीत, अशी खंत व्यक्त केली. मातृ मृत्यू दराची स्थिती भयावह आहे. सध्या भारतात एमएमआरचा दर 97 प्रति 1 लाख जिवंत जन्म आहे. जो यु.एन.ने निश्चित केलेल्या 70च्या टार्गेटपेक्षा जास्त आहे. आसाम, मध्यप्रदेश या ठिकाणची स्थिती तर आणखीन गंभीर आहे. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमातसुध्दा अनेक त्रुटी आहेत. विशेषतः वाहने अपुरी आहेत. त्यामुळे अनेक गर्भवतील महिलांना धोके निर्माण होत आहेत. खाजगी रुग्णालयांमधून अनावश्यक सिझेरियन शस्त्रक्रियेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यावर कठोर नियंत्रण आवश्यक असून आरोग्य सेवांसाठी भरघोस निधीची गरज आहे. सद्यस्थितीत एच.पी.व्ही. लसीकरणाबाबतही चिंताजनक स्थिती आहे. ही लस गरोदर महिला व मुलींना सर्वसामान्यपणे मिळावी यासाठी अद्याप सरकारने कोणताही ठोस निधी मंजूर केलेला नाही. पोषणाच्या बाबतीतसुध्दा आनंदी आनंद आहे. त्यामुळे जीडीपीच्या 2.5 टक्के निधी आरोग्यासाठी मंजूर करावा, आरोग्य सेवांसाठी पायाभूत सुविधा मजबुत कराव्यात, गर्भवती महिलांसाठी प्रसवपूर्व व प्रसोत्तर सेवांचा विस्तार करावा, डॉक्टर आणि परिचारिका यांची संख्या वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


