Author: Lok Sanchar

परभणी,(प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून तुकाराम मुंडे यांच्या ऐवजी ग्रामविकास पंचायतराज विभागातील सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव हेमंत महाजन यांनी आज मंगळवार 23 जून रोजी एका अध्यादेशाद्वारे नव्या पालक सचिवांची नियुक्ती केली. तुकाराम मुंडे हे या जिल्ह्यात पुर्वी पालक सचिव म्हणून नियुक्त केल्या गेले होते. परंतु, नियुक्तीपासून ते आजतागायतपर्यंत ते या जिल्ह्यात दाखल झालेच नाहीत. आज ना उद्या ते येतील म्हणून या जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तूळाचे त्यांच्या दौर्‍याकडे लक्ष लागले होते. दुर्देवाने मुंडे यांच्या नियुक्तीपासूनच्या पहिल्या दौर्‍यापूर्वीच सामान्य प्रशासन विभागाने डॉ. पुलकुंडवार यांच्या नियुक्तीचा आदेश दिला. यज्ञटंट्

Read More

परभणी, ( प्रतिनिधी) ) : मानवत तालुक्यातील यशवाडी येथे देवस्थान परिसरातील सभा मंडप कोसळून पाच जणांचा मृत्यू आणि १८ जण गंभीर जखमी झाल्याच्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने धार्मिक स्थळांच्या सुरक्षिततेबाबत कठोर पावले उचलली आहेत. भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजयसिंह चव्हाण यांनी जिल्ह्यातील सर्व देवस्थाने, धार्मिक स्थळे, सभा मंडप व सार्वजनिक वापराच्या संरचनांसाठी सर्वसमावेशक प्रतिबंधात्मक निर्देश जारी केले असून बांधकाम पूर्ण होऊन सक्षम स्थापत्य अभियंत्याकडून स्थैर्य प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच नागरिकांना प्रवेश देण्यात यावा. सदरील सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यवस्थापन समिती, ट्रस्ट अथवा बांधकाम संस्था यांना झालेल्या दुर्घटनेस जबाबदार धरण्यात येईल व त्यांच्याविरुद्ध…

Read More

‘एकल महिला’ नव्हे, ‘पूर्णागिणी’ : जिल्हाधिकारी यांचा सकारात्मक विचारांचा संदेश* परभणी, (प्रतिनिधी) : महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद परभणी यांच्या वतीने आयोजित ‘एकल महिला धोरण’ विषयावरील जिल्हास्तरीय कार्यशाळेला विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, एकल महिला प्रतिनिधी तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक सक्षमीकरणासाठी प्रभावी व सर्वसमावेशक धोरणाची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली. कार्यशाळा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर तसेच महिला व बाल विकास समितीच्या सभापती ऐश्वर्या अजयराव चव्हाण उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) मानवत तालुक्यातील यशवाडी येथील श्री हनुमान मंदिर, येथे २० जून रोजी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील सभा मंडप कोसळून पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये या प्रमाणे एकूण २५ लाख रुपये आर्थिक मदत तातडीने मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सचिवालयाने जिल्हाधिकारी, परभणी यांना पाठविलेल्या पत्रानुसार या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या संतोष गडदे, आकाश सुरजोसे, नुमेश अगरवाल, सूरज कोपरटकर, श्रीकृष्ण गवारे यांच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर मदतीची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीच्या खात्यातून स्टेट बँक ऑफ इंडिया,…

Read More

परभणी, (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत सईद खान शेरगुल खान हे विजयी झाले. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी निवडणूक निरीक्षक रूचेश जयवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूणा संगेवार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचारी तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दि. 18 जून रोजी या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सात मतदान केंद्रावर 466 पैकी 465 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतांची मतमोजणी आज कडेकोट बंदोबस्तात तसेच शांततेत व सुरळीत पार पडली. आज झालेल्या मतमोजणीनंतर सईद खान शेरगूल खान (पक्ष-शिवसेना)…

Read More

परभणी, (प्रतिनिधी)  :-महाराष्ट्र शासनामार्फत दिनांक २ जून २०२६ च्या शासन निर्णयान्वये “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना” राबविण्यात येत आहे. शासन निर्णयान्वये राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत करण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक हा चालू मोबाईल क्रमांकाशी संलग्न करून अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण व जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था भाग्यश्री मुंडे यांनी केले आहे. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ व अतिवृष्टीमुळे पीक कर्जाची…

Read More

परभणी, (प्रतिनिधी)  :-महिला व बाल विकास विभागाच्या निर्देशानुसार दि. २३ जून २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व ग्रामपंचायत स्तरावर “एकल महिला दिवस” साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मंगळवार, दि. २३ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद, परभणी येथील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, शासनस्तरावर एकल महिला धोरण तयार करण्यासाठी नागरिकांचे अभिप्राय मागविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर एकल महिलांसाठी कार्य करणाऱ्या महिला स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्या तसेच संबंधित व्यक्तींनी धोरणाबाबत सूचना व अभिप्राय सादर करण्यासाठी या कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. एकल महिलांसाठी काम करणाऱ्या इच्छुक…

Read More

परभणी, (प्रतिनिधी)  :”बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम बनवावे” विद्यार्थ्यांनी योग्य ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते असे प्रतिपादन श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर यांनी केले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज, परभणी यांच्या वतीने तसेच सवंडकर मॅथ्स क्लासेस, परभणी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आज महाविद्यालयाच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मनेश कोकारे, डॉ. महेश पाटील व डॉ. किरण सानप…

Read More

परभणी,(प्रतिनिधी) : परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या निवडणूकीत महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी 465 पैकी पहिल्या पसंती क्रमांकाचे सर्वाधिक 242 मते मिळवून विजय पटकाविला. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार 22 जून रोजी सकाळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण व निरीक्षक रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. त्यावेळी निवडणूक रिंगणातील प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पहिल्या पसंती क्रमांकाची मते मोजण्यात आली. त्यात एकूण 465 मतापैकी पहिल्या पसंती क्रमांकाचे सर्वाधिक म्हणजे 242 मते महायुतीचे उमेदवार खान यांनी पटकावले त्या पाठोपाठ महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. विवेक नावंदर यांना 159 म्हणजे दुसर्‍या क्रमांकाचे तर अपक्ष उमेदवार सुशिलभैय्या देशमुख यांना 56 मते मिळाली. ते तीसर्‍या क्रमांकावर राहिले. एकूण मतदानात 8…

Read More

परभणी, ( प्रतिनिधी)  यशवाडी येथे मंदिरासमोरील सभा मंडप कोसळल्याच्या अत्यंत दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून करण्यात आलेल्या बचाव व मदतकार्याचा आढावा घेतला. त्यानंतर रुग्णालयात जाऊन जखमी नागरिकांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच उपचारांबाबत डॉक्टर आणि प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेतली. जखमींना कोणत्याही प्रकारचा विलंब न होता तातडीने आणि सर्वोत्तम उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांप्रती शोक व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले. या दुःखद प्रसंगी प्रभावित कुटुंबियांसोबत शासन व…

Read More