परभणी जिल्हा मराठी पत्रकारसंघाच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप परभणी(प्रतिनिधी) परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कारेगाव येथील वसंत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी कौशल्य विकासचे सहाय्यक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही हा डॉ. आंबेडकरांचा संदेश विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनात दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रविण धाडवे हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून पत्रकारसंघाचे जिल्हाध्यक्ष प्रभू दिपके, कार्याध्यक्ष लक्ष्मण मानोलीकर, नजीर खान, जकीयोद्दीन खतीब, राजकुमार हट्टेकर, विठ्ठलराव वडकुते, मोईन खान, शिवशंकर सोनुने, मंदार कुलकर्णी, लक्ष्मीकांत बनसोडे, अरुण रणखांबे, तय्यब पठाण,…
Author: Lok Sanchar
पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील पेठ शिवणी येथील भारतरत्न डॉ बाळासाहेब आंबेडकर १३४ वी सार्वजनिक जयंती उत्सव आयोजनासाठी बुद्ध विहार पेठ शिवणी येथे बैठकीचे आयोजन करण्यात येऊन सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार विलास वाघमारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून तर उपाध्यक्षपदी किशोर वाघमारे , सचिव पदी पत्रकार अंकुश वाघमारे, सहसचिव पदी दिनाजी भालेराव, कोषाध्यक्षपदी सिद्धार्थ जोंधळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून प्रति वर्षाप्रमाणे काही वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सार्वजनिक जयंती साजरी करण्यात येणार असून दि २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमेचे पूजन व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न होईल तसेच ४:००वाजता पेठ शिवणी गावातील…
पालम. (प्रतिनिधी) सभागृहच्या माध्यमातून अखंडता जगता येईल असे प्रतिपादन आ. रत्नाकर गुट्टे यांनी दि. १९ रोजी शनिवारी तालुक्यातील खडी येथील स्थानिक निधीतून उभारण्यात आलेल्या तक्षशिला बौद्धविहार सभागृहाचे लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना व्यक्त केले. पुढे बोलताना आ. गुटे म्हणाले की गावखेड्यात अशी वास्तू असणे गरजेचे आहे. त्यामुळे गरजू व गोरगरीबांना कौटुंबिक सोहळे साजरे करणे शक्य होईल. ग्रामस्थांना एकत्र येऊन विविध कार्यक्रम घेता येतील. तसेच त्यातून एकता, अखंडता जपता येईल, असे आ.डॉ.गुट्टे साहेब यांनी म्हटले आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रामचंद्र निळे, मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष संदीप अळनुरे, तालुकाध्यक्ष चंद्रशेखर लांडगे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष पवन सोन्नर, मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष गंगाधर मस्के, साहेबराव नखाते, मनोहर…
पालम :- शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी सुभाषराव भागोजी रूद्रवार वय 69 वर्ष यांचे दिनांक 18 एप्रिल रोजी संध्याकाळी 8 वाजता निधन झाले आहे त्याच्या पश्वात आई, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, भाऊ, बहिनी असा मोठा परीवार आहे दिनांक 19 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता हिंदु स्मशानभुमी गंगाखेड रोड पालम येथे अंत्यविधी होणार आहे
गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेतील शिक्षकांचा गौरव सोहळा संपन्न ‘परभणी (प्रतिनिधी)तंत्रज्ञानासोबत संस्कारांची रुजवणूक आवश्यक असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी सांगितले. ते जुने ते सोने, नवे ते हवे’ या विचाराने प्रेरित होऊन शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या शिक्षकांच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेतील तालुका व जिल्हास्तरावरील विजेत्या शिक्षकांचा सन्मान परभणीत संपन्न झाला.यावेळीं बोलत होते. ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग, परभणी यांनी केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी विजेत्या शिक्षकांचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन…
पालम (प्रतिनिधी) कृ. उ बाजार समिती येथे विविध कार्यकारिणी सोसायटी सावंगी थडी चेअरमन पदी ओंकार साहेबराव ठाकूर यांची आणि उमरा सोसायटी चेअरमनपदी उगले साहेब माधवराव यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा व सर्व सदस्य यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी गणेशराव रोकडे दादा (रासपा प्र.उपा म.राज्य तसेच संचालक जि.म.सह बँक परभणी) सावंगीथडी सदस्य कोंडीबा सखाराम ठाकूर, मुरलीधर विठ्ठल ठाकूर ,पंढरी विठ्ठल ठाकूर, एकनाथ भीमराव ठाकूर,गजानन व्यकंटराव ठाकूर,त्रिबंक गोविंदराव ठाकूर, किशोरभाई दसराव ठाकूर,परसराम नरहरी ठाकूर, सीताराम मारोती ठाकूर,बालाजी राघोबा ठाकूर आणि उमरा सोसायटी सदस्य पांडुरंग हगदळे, रावसाहेब,विद्या उगले शेख बानूब, माधव बोडके, हरी काचूळे, नारायण उगले, चंद्रकांत पौळ,भास्कर शिंदे,दत्ता गिरी, नवनाथ…
परभणी, (प्रतिनिधी) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्यामार्फत देशभरात राबविण्यात येणाऱ्या ‘आपदा मित्र कार्यक्रमा’अंतर्गत परभणी जिल्ह्यातील 300 स्वयंसेवकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षित स्वयंसेवकांमधून चक्रधर जावळे, अभिषेक भोसले, विष्णू राठोड आणि चंद्रशेखर कदम या चार जणांची निवड मास्टर ट्रेनर म्हणून करण्यात आली. निवड झालेल्या या आपदा मित्रांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गुजरात येथे 21 दिवसांचे निवासी ऍडव्हान्स प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणात विविध प्रकारच्या नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीमधील व्यवस्थापन, तांत्रिक कौशल्य, शोध आणि बचाव कार्य, समुदायाला प्रशिक्षण देण्याची पद्धत, आणि प्रभावी समन्वय अशा अनेक बाबींचा समावेश होता. प्रशिक्षण पूर्ण करून परतल्यानंतर आज या चारही आपदा…
परभणी (प्रतिनिधी) आर.पी.हॉस्पिटल व परभणी मेडिकल कॉलेज येथील डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या पोटातून काचेची लांब बाटली यशस्वीपणे काढून जीवदान दिले आहे. एक व्यक्ती पोटदुखीच्या तक्रारीने रुग्णालयात दाखल झाली होती. प्राथमिक तपासणी नंतर शल्य चिकित्सक डॉ.अमीर तडवी यांनी रुग्णाचा एक्स-रे, सोनोग्राफी करून घेतली व पोटात बाटली असल्याचे निश्चित झाल्या नंतर रुग्णाला पोटाच्या आतड्याचा संसर्ग आणि आतड्यात जखमा झाल्याचे आढळून आले. आर.पी.हॉस्पिटल व परभणी मेडिकल कॉलेज येथील डॉ. अमीर तडवी, भुलतज्ञ डॉ.श्रीकांत वांगीकर ओ.टी.स्टाफ संध्या आळणी, किशोर नवले व इतर कर्मचारी यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून ही काचेची बाटली काढली. शस्त्रक्रियेनंतर आणि अतिदक्षता विभागातील औषध उपचारा नंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.…
पालम (प्रतिनिधी) तालुक्यातील बरबडी येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी गणेशराव रोकडे यांच्या सहकार्यामुळे बिनविरोध काढण्यात आल्यामुळेसोसायटी सर्वसदस्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गणेशराव रोकडे दादा(रासपा प्र.उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसेच संचालक जि. म.सह बँक परभणी) यावेळी पुंडलिक डांगे(सरपंच) अंगदराव कुरे, सदस्य डांगे बालासाहेब नारायण, डांगे पंढरी बालासाहेब,डांगे गणपती नारायण,डांगे उत्तम तातेराव,डांगे कैलास व्यंकटी,कर्वे नागोराव नामदेव,डांगे गंगाधर भगवान,डांगे दत्तराव गणपतराव,डांगे, लक्ष्मी पंढरीनाथ,पवार शंकर जैसे, माळवटकर संजय बालाजी,वंजारे नीलकंठ ग्यानबा,डांगे कोंडाबाई प्रकाश इत्यादी सर्व सदस्य मंडळी उपस्थित होते
पालम (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती शहरातील विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. बौद्ध विहार पालम येथे यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण पालम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय सुरेश थोरात, यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालम नगरपंचायत चे नगराध्यक्ष वसंत काका सिरस्कर यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास पालम सभापती गजानन गणेशराव रोकडे, नगरसेवक लक्ष्मण रोकडे, उपनगराध्यक्ष इमदाद खान पठाण, कृषी अधिकारी आबासाहेब देशमुख, सुभाषराव धूळगुंडे, गटनेते भास्करराव सिरस्कर, रामजी मणियार, नगरसेवक सय्यद इखार भाई,…