परभणी (प्रतिनिधी) : परभणी पंचायत समिती अंतर्गत शाखा अभियंता अण्णासाहेब किशनराव तोडे यास 10 हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या एका पथकाने ताब्यात घेतले.
15 व्या वित्त आयोगामध्ये अंगणवाडीतील कंपाऊंड वॉल व नालीचे बांधकाम तक्रारकर्त्याने केले होते. या बांधकामाचे एमबी लिहिण्याकरीता परभणी पंचायत समितीत कागदपत्रे सादर केली. 4 मार्च रोजी शाखा अभियंता अण्णासाहेब किशनराव तोडे यास संबंधित तक्रारदार भेटले. परंतु, एमबी लिहिण्याकरीता 10 हजार रुपये द्यावे लागतील, असे तोडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. ही रक्कम लाच असून ती तक्रारकर्ता यांना द्यावयाची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्यांनी लगेचच लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे धाव घेतली.
या खात्याच्या पथकाने 18 मार्च रोजी लाच मागणीची पंचा समक्ष पडताळणी केली. त्यावेळी अण्णासाहेब किशनराव तोडे याने 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ती रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शविल्याचे निदर्शनास आले. या खात्याच्या पथकाने 24 मार्च रोजी सापळा रचला, तेव्हा शाखा अभियंता तोडे हा तक्रारकर्त्याकडून 10 हजार रुपयांच्या लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारतांना रंगेहाथ पकडला गेला. या खात्याच्या पथकाने तोडे यांची अंगझडती घेतली, त्यात रोख रक्कम 1 हजार 330 रुपये व मोबाईल सापडला. पथकाने तातडीने तोडे यांच्या यशोधन नगरातील निवासस्थानी घरझडती घेतली, त्यात रोख 58 हजार 500 रुपये आणि 80 ग्राम सोन्याचे दागिणे मिळाले.
दरम्यान, पोलिस अधिक्षक संदीप पालवे, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. संजय तुंगार, पोलिस उपअधिक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीमती माधुरी यावलीकर (नांदेड), एएसआय निलपत्रेवार, अनिरुध्द कुलकर्णी, सीमा चाटे, अतूल कदम, नामदेव आदमे, जे.जे. कदम, ईश्वर जाधव, शाम गोरपल्ले, नामपल्ले आदी परभणी व नांदेडच्या कर्मचार्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


