पालम (प्रतिनिधी) ) तालुक्यातील पेठशिवणी येथील श्री बसवेश्वर प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी कु.वेदिका गजानन कामटकर हिची केंद्रीय जवाहर नवोदय प्रवेशासाठी ग्रामीण विभागातून निवड झाली आहे. अशी माहिती मुख्याध्यापक प्रशांत करंजे यांनी दिली. केंद्रीय जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा 2025 मधून इयत्ता 6 वी प्रवेशासाठी परभणी जिल्ह्यातून या विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये तिने यश संपादन केले आहे.या विद्यार्थिनीस श्री राजपाल दुर्गे सर व गजानन थाडगे, संग्राम ढगे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
शाळा विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि गुणवत्ता शिक्षण देण्यासाठी सतत प्रयत्न करत असल्याची माहिती नागनाथ खेडकर सर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल सर्व ग्रामस्थ मंडळींनी अभिनंदन केले. या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी श्री गायकवाड साहेब केंद्रप्रमुख रुद्रवार, मुख्याध्यापक प्रशांत करंजे ,वर्ग शिक्षक नागनाथ खेडकर ,प्रकाश शिनगारे,राजेंद्र मिटकरी अरुण रेकडगे यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


