परभणी,(प्रतिनिधी) : दोन लाख रुपयांची लाच स्विकारणार्या वादग्रस्त जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे-निंबाळकर व क्रिडा अधिकारी नानकसिंह बस्सी या दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या एका पथकाने गुरूवारी ताब्यात घेतले. शुक्रवारी (दि.28) या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सूनावली आहे.
क्रिडा अकॅडमीच्या जागेवरील स्विमिंग पुलाच्या बांधकामासह या स्विमिंग पुलावर 2024 साली आयोजित केलेल्या क्रिडा स्पर्धांच्या एकूण 95 लाख रुपयांचे थकीत बिल मिळावे यासाठी तक्रारकर्त्याने जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा सुरु केला, परंतु प्रत्येकवेळी जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे यांनी जाणिवपूर्वक त्रुटी काढल्या. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने या थकीत बिलांच्या मंजूरीकरीता क्रिडा अधिकारी बस्सी व जिल्हा क्रिडा अधिकारी नावंदे या दोघांच्या 3 मार्च रोजी स्वतः भेटी घेतल्या. त्यावेळी नावंदे यांनी 2 लाख रुपये व बस्सी यांनी 50 हजार रुपये असे एकूण 2 लाख 50 हजार रुपयांची लाच मागितली. संबंधित तक्रारकर्त्याने 13 मार्च रोजी नावंदे यांना क्रिडा अधिकारी बस्सी यांच्या समक्ष 1 लाख रुपये सुपूर्त केले परंतु, उर्वरित दीड लाख रुपये द्यावयाची इच्छा नसल्याने या तक्रारकर्त्याने 24 मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे एक तक्रार दाखल केली. या खात्याच्या पथकाने 24 मार्च रोजीच लाच मागणीची पडताळणी केली. बस्सी व नावंदे यांची भेट झाली नाही. 25 मार्च रोजी पुन्हा पडताळणी केली. त्यावेळी नावंदे यांची भेट झाली. तक्रारकर्त्याने प्रलंबित लाचेसंदर्भात बोलले असता नावंदे यांनी पक्षा समक्ष तक्रारकर्त्यास बस्सी सर येतील ते करुन टाका, असे म्हणून उर्वरित लाचेची रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शविली. या खात्याने त्या आधारे गुरुवार 27 मार्च रोजी सापळा रचला व नानकसिंह बस्सी यास 50 हजार रुपये व जिल्हा क्रिडा अधिकारी नावंदे यांना 1 लाख रुपयांची लाच स्विकारतांना ताब्यात घेतले. शुक्रवारी (दि.28) या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सूनावली आहे.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


