परभणी, (प्रतिनिधी,)महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), जिल्हा कार्यालय परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत प्रगती लोकसंचालित साधन केंद्र, परभणी यांची १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार (दि. ६) रोजी श्री मंगल कार्यालय, परभणी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेला कार्यक्षेत्रातील सुमारे ९०० महिलांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावून महिला सक्षमीकरणाचा अनोखा संदेश दिला. कार्यक्रमास मा. श्री. भूषण काळे (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, परभणी), मा. श्री. रामचंद्र आकुलवार (जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक, परभणी), मा. श्री. पी. टी. वटाने (जिल्हा उद्योग केंद्र, परभणी), मा. सौ. सुजाता लाकुंडे (कृषी व व्यवस्थापन तज्ज्ञ, आत्मा, परभणी), मा. सौ. जया नेमाने (जिल्हा समन्वय…
Author: Lok Sanchar
फळपिक विमा योजनेसाठी अर्ज करण्यास १४ जुलैपर्यंत मुदतवाढ* परभणी दि. 06 (जिमाका) : शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पिक विमा नोंदणी पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, दौलत चव्हाण यांनी केले आहे. पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (मृग बहार) सन २०२६-२७ अंतर्गत संत्रा, द्राक्ष, पेरू, लिंबू, हळद, मोसंबी व चिकू या अधिसूचित पिकांसाठी पिक विमा भरण्याची अंतिम मुदत संपली होती. मात्र, पिक विमा नोंदणीचे पोर्टल विलंबाने सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र शासनाने या पिकांसाठी अर्ज करण्यास दि. १४ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतवाढीचा लाभ कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी घेऊ…
परभणी, (प्रतिनिधी) – संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, परभणीकरीता सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजने अंतर्गत ५० लाभार्थी व बिजभांडवल योजने अंतर्गत ५५ लाभार्थीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. या दोन योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात. या योजनांच्या लाभासाठी चांभार समाजात अंतर्भाव असणाऱ्या चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदारांकडुन विविध व्यवसायांसाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. तरी सदर योजनांसाठी कर्ज प्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यातील अर्ज दि. ०७ जुलै ते दि. 7 ऑगस्ट २०२६ पर्यंत (सार्वजनिक सुट्टी वगळता) कार्यालयीन वेळेत, जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड, परभणी या ठिकाणी स्विकारले…
परभणी,प्रतिनिधी) : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात आयोजित खासदारांच्या बैठकीत परभणी लोकसभा मतदारसंघातील रेल्वे विकास, प्रवाशांच्या सुविधा आणि विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी सविस्तर चर्चा करत रेल्वे प्रशासनासमोर अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. मराठवाड्यातील रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास, प्रवाशांच्या सुरक्षिततेत वाढ आणि रेल्वे सेवांचे आधुनिकीकरण यावर त्यांनी विशेष भर दिला. बैठकीत नांदेड रेल्वे मंडळाचा विस्तार मराठवाड्यातील अधिक भागांपर्यंत करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. परभणी, पूर्णा आणि परळी वैजनाथ येथील प्रस्तावित रेल्वे बायपासची कामे तातडीने पूर्ण करण्याबरोबरच परभणी रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणीच्या कामाला गती देण्याची मागणीही करण्यात आली. परभणी स्थानकावर कोच वॉटर फिलिंगची कायमस्वरूपी सुविधा उपलब्ध करून देणे, प्लॅटफॉर्म…
परभणी,(प्रतिनिधी) : सक्षम व जबाबदार युवक घडविण्यासाठी तसेच आत्मनिर्भर आणि सुसंस्कृत भारताच्या निर्मितीसाठी शिक्षकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले. परभणी शहरातील बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेच्या माजी उपाध्यक्षा स्व. प्रा. वासंतीताई नावंदर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘आत्मचिंतन दिन’ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार झरकर होते, तर प्रमुख व्याख्याते म्हणून प्राचार्य डॉ. दीनानाथ फुलवाडकर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. विवेक नावंदर, उपाध्यक्ष अॅड. विलासराव पोहंडूळकर, सहसचिव अॅड. संजय देशपांडे, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी गोविंद मोरे, संस्थेचे सदस्य पवनकुमार झांजरी, एम. जी.…
*पॉक्सो जनजागृती शिबिरातून सजग समाजाचा संदेश* परभणी,(प्रतिनिधी) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि श्री शिवाजी विधी महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम, २०१२ (POCSO)’ या विषयावरील जनजागृती प्रशिक्षण शिबिर श्री शिवाजी विधी महाविद्यालयात आज संपन्न झाले. बालकांच्या सुरक्षिततेबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात न्यायव्यवस्था, पोलीस, वैद्यकीय अधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा परभणी जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती संजय ए. देशमुख हे उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आर. एम. सादराणी अध्यक्षस्थानी होते.…
परभणी,( प्रतिनिधी) : शेगावहून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पायी पालखीचे परभणी शहरात भक्तिमय वातावरणात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. दत्तधाम येथे परभणी महानगरपालिकेच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने स्वच्छता, आरोग्य सेवा आणि वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी विशेष नियोजन केले होते. दत्तधाम ते वसमत रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मोंढा आणि रोकडे हनुमान मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पालखी मार्गावर स्वच्छता कर्मचारी व घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. महानगरपालिका आरोग्य विभागाच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे…
परभणी,(प्रतिनिधी) : श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारी (दि. 4) परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी भक्तिमय वातावरणात उत्साहाने स्वागत करण्यात आले. पालखीच्या आगमनाने संपूर्ण परिसर ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने दुमदुमून गेला. पालखी मार्गावरील विविध गावांमध्ये ग्रामस्थ व भाविकांनी फुलांची उधळण करून पालखीचे स्वागत केले. वारकर्यांसाठी महाप्रसाद, पिण्याच्या पाण्याची तसेच वैद्यकीय सेवेची व्यवस्था करण्यात आली होती. पालखीच्या दर्शनासाठी मार्गावर हजारो भाविकांनी गर्दी केली होती. पालखीसोबत मोठ्या संख्येने वारकरी, टाळकरी, मृदंगवादक आणि पताकाधारी सहभागी झाले होते. अखंड हरिनाम, भजन-कीर्तन आणि अभंग गायनामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने वारीत सहभाग…
परभणी,(प्रतिनिधी) : शिवसेनेला राजकीय मान्यता आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळवून देण्यात परभणी जिल्ह्याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकजुटीने काम करून जिल्ह्यात शिवसेनेची ताकद अधिक वाढविणार असल्याचे प्रतिपादन खासदार संजय जाधव यांनी केले. शनिवारी (दि. 4) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, माणिक पौंढे आणि प्रवीण देशमुख उपस्थित होते. खासदार जाधव म्हणाले की, आपली बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी कायम बांधिलकी राहिली आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आणि आग्रह लक्षात घेऊनच मागील 22 जून रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आपल्या राजकीय प्रवासाचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की,…
परभणी, (-आषाढी वारी पालखी सोहळा 2026 च्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षित, सुखकर आणि सुविधायुक्त प्रवासासाठी व्यापक नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी नतिशा माथुर यांच्या मार्गदर्शनानुसार निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी विविध विभागांना समन्वयाने काम करून वारकऱ्यांना आवश्यक सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेशव्दारे सूचित केले आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस विभागप्रमख उपस्थित होते. जिल्ह्यातून तसेच जिल्ह्याबाहेरून पंढरपूरकडे जाणाऱ्या सुमारे 43 दिंड्या परभणी जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहेत. दि. 4 जुलैपासून प्रमुख दींड्या परभणी जिल्हयात दाखल होणार आहे. तर दि. 17 जुलैपर्यंत विविध दिंड्यांचे आगमन सुरू राहणार आहे. श्रीक्षेत्र त्रिधारा, रोकड हनुमान मंदिर (नवा…

