परभणी (प्रतिनिधी) – सदरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राज्यभर आयोजित ‘एकता दौड – Run For Unity’ या भव्य कार्यक्रमाच्या नियोजनासाठी भारतीय जनता पार्टी परभणी महानगर व जिल्हा पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक आज परभणी येथे पार पडली.
ही बैठक भाजपा परभणी महानगर कार्यालय, वसमत रोड येथे जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी शेषरावजी भरोसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, मंडळाध्यक्ष, तसेच विविध मोर्चे व आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते गांधी पार्क, परभणी दरम्यान होणाऱ्या ‘एकता दौड’ कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या नियोजनाची रूपरेषा, जबाबदाऱ्यांचे वाटप, तसेच नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध उपक्रमांवरही विचारविनिमय करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी सांगितले की, “सदरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताचे एकीकरण करून राष्ट्रीय एकतेचे अप्रतिम उदाहरण घालून दिले. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘Run For Unity’ ही दौड हे एकतेचे प्रतिक ठरेल. परभणीतील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवावा, हेच खरे आदरांजली ठरेल.”
परभणीतील सर्व नागरिक, युवक व महिला यांनी या एकता दौडीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.


