Author: Lok Sanchar

परभणी (प्रतिनिधी) येथील जेष्ठ नागरिक श्रीमती प्रभावती बाळकृष्णराव मुळे यांचे शनिवारी सायंकाळी पाच वाजता वृद्धकाळामुळे निधन झाले, त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी दहा वाजता जिंतूर रस्त्यावरील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी शिवाजीनगर येथील डॉक्टर प्रकाश मुळे यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. दरम्यान श्रीमती मुळे यांच्या पश्चात प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रकाश मुळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक डॉ. प्रमोद मुळे ,ज्ञानोपासक महाविद्यालयातील जेष्ठ प्राध्यापक रविंद्र मुळे यांच्यासह सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. दैनिक लोकसंचार परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Read More

परभणी, (प्रतिनिधी) : मान्सून कालावधीत विशेषतः जून ते सप्टेंबर या महिन्यात वीज पडून जिवीत व वित्त हानी होते. ही जिवीत व वित्त हानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी “दामिनी”अॅप तयार केले आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. हे अॅप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा. “दामिनी” अॅप जीपीएस लोकेशनच्या आधारे काम करते. वीज पडण्याच्या 15 मिनिटांपूर्वी अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. ॲपच्या माध्यमातून आपल्या सभोवतालच्या परिसरात वीज पडणार असल्याचे लक्षात येताच त्या ठिकाणापासुन सुरक्षित स्थळी जावे. अशा वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये. याबाबतच्या सूचना अॅप‌द्वारे वापरकर्त्यांना दिल्या जातात. त्यामुळे नागरिकांनी “दामिनी” ॲप…

Read More

पालम (प्रतिनिधी) पावसाळा अगदी दारावर येऊन थांबला असताना सुद्धा पालम ते राणी सावरगाव या रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण झाले नसून हे काम अत्यंत संत गतीने चालू आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांची गैरसोय होत असून शेतीकामासाठी तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर जाता येता सुद्धा शेतकऱ्यांना येत नाही पालम ते राणीसावरगाव रस्त्याच्या कामासाठी खुप वर्ष प्रतीक्षा करण्यात आली विविध संघटना राजकीय पक्ष आपापले मतभेद विसरून हा रस्ता व्हावा यासाठी आंदोलन करण्यात आली. आणी त्यांच्या प्रयत्नांना यश आले रोडचे काम पण दिपवाळी झाल्यानंतर सुरुवात झाले पण ते काम एवढे संथ गतीने सुरुवात आहे की पाऊसाळा सुरु होण्यास अवघे कधी दिवस शिक्कल आहेत अजुन…

Read More

परभणी: (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री .एकनाथजी शिंदे व संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या आदेशावरून दि. २२ रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुषंगाने परभणी शिवसेना जिल्ह्याच्या वतीने भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन दि. २२ गुरुवार रोजी सकाळी १० वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्व देशवासीयांच्या भावना ओळखून पुलवामा येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ‘ऑपरेशन सिंदूर’ याद्वारे अतिरेक्यांना सडेतोड उत्तर दिले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले. पाकिस्तानच्या संरक्षणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या…

Read More

पालम प्रतिनिधी ) दिनांक 14 फेब्रुवारी मार्च 2025 च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ममता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अंबोरे सर आणि प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारूती कारवार तसेच माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर श्री गुडदे सर आणि माजी मुख्याध्यापक श्री कानगुले सर हे होते शालांत प्रमाणपत्र परीक्षेत एकूण 272 विद्यार्थी परीक्षेला बसली त्यापैकी 253 उत्तीर्ण झाले विद्यालयाचा निकाल सरासरी 93% लागला 90% पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी 34 असून त्यांचा विद्यालयातर्फे आज सत्कार करण्यात आला या सत्कार समारंभाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख अतिथी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपले…

Read More

सेलू :(प्रतिनिधी) मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यालयाने निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून, शाळेच्या स्वराज लक्ष्मण जाधव याने १०० टक्के गुण घेऊन राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. प्रावीण्य श्रेणीत ११५, तर २८ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण विशेष प्रावीण्य मिळविले आहे. संस्कृत विषयात ६, तर विज्ञान विषयात एका विद्यार्थ्यांने १०० टक्के गुण मिळवून शाळेच्या लौकिकात भर घातली आहे. दहावीचा निकाल मंगळवारी, १३ मे रोजी जाहीर झाला. सेलू तालुक्यातून दहावीच्या परीक्षेला नूतन विद्यालयाचे सर्वाधिक एकूण ५०१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ४४० विद्यार्थी (८७.८२ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.…

Read More

परभणी (प्रतिनिधी) ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या सिद्धेश्वर विद्यालय जिंतूर या शाळे चा जिंतूर शहरात दहावीच्या निकालामध्ये द्वितीय क्रमांक. शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये लागलेल्या इयत्ता दहावीच्या निकालामध्ये जिंतूर येथील सिद्धेश्वर विद्यालयाचा निकाल 96.66% इतका लागला असून सेमी इंग्लिश चा निकाल सलग चौथ्या वर्षी 100% लागलेला आहे यात विद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मुख्याध्यापक उपेंद्र दुधगावकर तथा सर्व शिक्षक बंधू भगिनी यांना अभिनंदन तथा शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार एडवोकेट गणेश रावजी दुधगावकर संस्थेच्या सचिव डॉ संध्याताई दुधगावकर संस्थेचे सहसचिव समीर भाऊ दुधगावकर यांनी केले. क्रीडा सांस्कृतिक स्काऊट गाईड नाटक बालनाट्य या क्षेत्रातील नावलौकिका बरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील निकालही या शाळेची जिंतूर शहरातील आपली…

Read More

ताडकळस (प्रतिनिधी)म हाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने आयोजित शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.कै. कमळाबाई वडकुते माध्यमिक विद्यालय, ताडकळस या विद्यालयाचा एस.एस.सी परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2025 परीक्षेचा निकाल शाळेचा एकूण निकाल 96.22% लागला आहे. एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी 53,उत्तीर्ण विद्यार्थी 51, अनुत्तीर्ण विद्यार्थी 02 सर्वप्रथम कु. दळवी मयुरी मारुती 93.80%द्वितीय क्रमांक कु. लेंडाळे गायत्री भागवतराव 86.40% तृतीय क्रमांक मगरे प्रणिता प्रकाश 80.40% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ. रामराव वडकुते,कार्याध्यक्ष विठ्ठलराव वडकुते,अध्यक्ष दिलीपराव वडकुते , विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून गौरविण्यात आले.

Read More

परभणी (प्रतिनिधी) प्रभाग क्रमांक 5 मधील ३६ इंची नाल्याचे पाणी दासगणू नगर मधून न काढून देता इतर व्यवस्थित नाली मधून नेण्यात यावे अशा आशयाचे निवेदन परभणी महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले. प्रभाग क्रमांक 5 मधील श्री संत दासगणू नगर मध्ये जे सद्यस्थिती नाली व्यवस्था आहे ती पुरेसे नसून ती कॉलोनी च्या सांडपाण्यासाठी सुद्धा मुबलक नाही. सध्यस्थिती तिथे पाणी घरा आत मध्ये जाते व रहिवाश्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. मागील काही दिवसापासून महानगर पालिका प्रभाग 5 मधील 20-25 कॉलोण्याचे 36 इंची नाल्याचे पाणी नगरातील 9 इंची नाल्या मार्फत सोडण्याचा विचार करत आहे. ही चुकीची जोडणी करण्यात येऊ नये. जेणे करून…

Read More

परभणी (प्रतिनिधी)शहरातील संस्कृती विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिनी समृद्धी सुधाकर श्रीखंडे हिने दहावीला 96 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दि.१३ मे रोजी दहावीचा निकाल दुपारी एक वाजता जाहीर केला. यामध्ये परभणी जिल्ह्याचा निकाल 89% लागला असून यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. दरम्यान नांदखेडा रोडवरील संस्कृती विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी समृद्धी श्रीखंडे तिला 96% गुण मिळाले आहे. यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. लोकसंचार परिवारातर्फे तिचे अभिनंदन.

Read More