परभणी/ प्रतिनिधी — मराठवाड्यात हैद्राबाद गॅझेट लागू झाल्यानंतर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत (एसटी) सामावून घेऊन आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसाठी परभणीत मंगळवार ७ ऑक्टोबर रोजी विराट मोर्चा काढण्यात येऊन या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले.
या मोर्चात मोठ्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले होते, अशी माहिती बंजारा समाजाचे नेते तथा सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांनी दिली आहे.
बंजारा समाजाचे नेते तथा सोनपेठचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांच्यासह अनेक बंजारा समाजाचे नेतेच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला.
हैदराबाद संस्थान गॅजेटच्या धर्तीवर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीतून (एस.टी.) प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मंगळवार दि.७ रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक लाख समाज बांधवांचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चात शिस्तीचे प्रदर्शन दिसणारा मोर्चा प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला . यावेळी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. प्रमुख आणि न्याय्य मागण्यांचा शासनाने वेळेत निर्णय घेतला नाही, तर आम्ही समाजबांधव मुंबईत धडकणार असून सरकारच्या दारात बसुन आरक्षण मिळवूनच थांबू, असे राठोड यांनी सांगितले.
या मोर्चात परभणीसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बंजारा समाजाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महिलां मोठ्या संख्येने सहभागी असून समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले असल्याची माहिती राठोड यांनी दिली आहे.
(सर्व छाया: संजय घनसावंत परभणी)


