परभणी (प्रतिनिधी) मानवी हक्क अभियान च्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री मा रामदास आठवले साहेबांना मानवी हक्क अभियान च्या वतीने महाराष्ट्रात गेल्या 40 वर्षांपासून दलित आदिवासी समाजाने गायरान जमिनीवर अतिक्रमण करून आपला उदरनिर्वाह करित आहेत शासनाचे अनेक परिपत्रक निघूनही स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही झालेली नाही.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा उलट अर्थ काढून महाराष्ट्र शासन दलित आदिवासींच्या ताब्यात असलेल्या गायरान जमिनी निष्कासित करून त्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी व ईतर कारखानदारांच्या घशात घालण्याचा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेबांनी महाराष्ट्र सरकारला धारेवर धरत दलित आदिवासी यांच्या ताब्यात असलेल्या गायरान जमिनी नांवे करून 7/ 12 मालकी हक्क देण्यात यावा यासाठी भाग पाडले पाहिजे.
तसेच मानवी हक्क अभियानाच्या वतीने 20 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर अतिक्रमित गायरान जमिनी कास्तकाराच्यां नावे होत नाहीत तोपर्यंत सत्याग्रह करण्यात येणार आहे. रमाई आवास योजनाला महागाई च्या धर्तीवर 5 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन कृषी योजनेच्या विहिरी साठी 7 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात यावा. अदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी मानवी हक्क अभियान परभणी जिल्हा अध्यक्ष पप्पुराज शेळके,शहर अध्यक्ष अरुण सोनवणे परभणी ता.उपाध्यक्ष गणेश हानवते गंगाखेड ता. अध्यक्ष अनिल कांबळे अदी उपस्थित होते.


