परभणी, (प्रतिनिधी) – आगामी मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदारांसोबत एक महत्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. निवडणुकीच्या तयारीसाठी आणि मतदारांशी संवाद साधण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, जिल्हा महामंत्री डॉ. पंडित दराडे, ॲड. एन. डी. देशमुख, युवा मोर्चा अध्यक्ष अजिंक्य गोंडेस्वार, तसेच हनुमान घुमरे, पवन सावंत, सुदर्शन बनसोडे, सचिन गारुडी आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत पदवीधर मतदार नोंदणी, मतदार जागरूकता अभियान, आणि निवडणूक व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन संत गाडगेबाबा शिक्षण प्रसारक मंडळ आणि जय नरसिंह शिक्षण प्रसारक मंडळ चे सचिव अभय कुंडगीर यांनी केले.


