परभणी (प्रतिनिधी) परभणी महानगर भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित पदनियुक्तीपत्र वितरण सोहळा उत्साहपूर्ण व मंगल वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री. देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच पालकमंत्री सौ. मेघनादीदी बोर्डीकर, संघटन मंत्री संजयजी कौडगे, ज्येष्ठ नेते मा.आ.. रामप्रसादजी बोर्डीकर व माजी मंत्री मा.आ. सुरेशराव वरपुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी महानगर जिल्ह्यातील विविध पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
नियुक्तीपत्र वितरण सोहळा हॉटेल रामायणा, वसमत रोड येथे उत्साहाच्या जल्लोषात पार पडला. या सोहळ्यात संघटन मंत्री संजयजी कौडगे, आयोजक परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे, ज्येष्ठ नेते विजयराव वरपुडकर, प्रमोद वाकोडकर, प्रेरणाताई वरपुडकर, राजेश देशमुख, सुनील देशमुख, संजय शेळके, मोहन कुलकर्णी, राजेश देशपांडे, मंगलताई मुदगलकर यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाला सर्व नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी, विविध मोर्चे, प्रकोष्ठ व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भाजपा प्रेरित नागरिक यांची उत्स्फूर्त उपस्थिती राहून कार्यक्रमाला भव्यता प्राप्त झाली.


