परभणी (प्रतिनिधी) गुरुमाऊली आयुर्वेद व लायन्स क्लब प्रिंस यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सुवर्णप्राशन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम दि. ५ जानेवारी २०२५ रोजी, गुरुमाऊली आयुर्वेद, जामकर कॉम्प्लेक्स, जिंतूर रोड, परभणी येथे सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत पार पडणार आहे. या उपक्रमाचा लाभ ० ते १५ वयोगटातील बालकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
सुवर्णप्राशन : एक वैज्ञानिक दृष्टिकोन
सुवर्णप्राशन हा आयुर्वेदातील एक महत्त्वाचा संस्कार असून बालकांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी तो अत्यंत उपयुक्त मानला जातो. कश्यपसंहिता व वृद्ध जीवक तंत्र या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सुवर्णप्राशनचे वर्णन “बालकांच्या आरोग्याचा पाया” असे करण्यात आले आहे.
वैज्ञानिक आधार
सुवर्णप्राशनमध्ये सुवर्णभस्म, मध व घृत यांचा समावेश असतो. या घटकांच्या संयुक्त सेवनामुळे बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढते, शरीरातील लिम्फोसाइट्स व अँटीबॉडीज निर्मितीस चालना मिळते, तसेच वारंवार होणारे आजार कमी होण्यास मदत होते.
सुवर्णप्राशनमधील घटक मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरचे कार्य सुधारतात, ज्यामुळे स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती व एकाग्रता वाढते. घृत व सुवर्णभस्म पचनसंस्थेतील अग्नी वाढवून पचनक्रिया सुधारण्यास उपयुक्त ठरतात.
संशोधनाचे निष्कर्ष
आधुनिक संशोधनानुसार सुवर्णभस्ममधील सुवर्ण नॅनोपार्टिकल्स मेंदूतील न्यूरॉन कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत करतात. यामुळे स्मरणशक्ती वाढते, मानसिक ताण कमी होतो आणि शारीरिक स्थैर्य सुधारते.
तसेच सुवर्णभस्म व मध यामध्ये अँटीमायक्रोबियल गुणधर्म असल्याने संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते. मध व घृत शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास सहाय्य करतात, त्यामुळे बालक अधिक सशक्त व निरोगी राहते.
आयुर्वेदिक लसीकरणाची संकल्पना
आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुवर्णप्राशनला आयुर्वेदिक लसीकरणाचे स्वरूप मानले जाते. नैसर्गिक घटकांच्या सहाय्याने शरीराला विविध ऋतुमानांसाठी सक्षम बनवणे, तसेच सर्दी, खोकला, ताप यांसारख्या सामान्य आजारांपासून संरक्षण देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
सुवर्णप्राशनचे प्रमुख फायदे.स्मरणशक्ती, बुद्धी व चपळता वाढते.पचनक्रिया सुधारून पोषणाचा पूर्ण लाभ मिळतो.आजारांविरोधातील प्रतिकारशक्ती वाढते.ऋतुमान बदलामुळे होणारे आजार कमी होतात.बालकाचे एकूण आरोग्य सुदृढ होते
सुवर्णप्राशन ही आयुर्वेदाची प्रभावी व वैज्ञानिक पद्धत असून ती बालकांच्या आरोग्याचा मजबूत पाया घालते. “आरोग्यम् धनसंपदा” या तत्त्वानुसार सुवर्णप्राशन देणे ही पालकांसाठी आरोग्यदायी गुंतवणूक असल्याचे मत गुरुमाऊली आयुर्वेदचे डॉ. संदीप चव्हाण यांनी व्यक्त केले.
Sunday, February 8
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


