परभणी , (प्रतिनिधी) : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कामकाजात गंगाखेड विधानसभा मतदारसंघाने ९६.४२ टक्के काम पूर्ण करत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार माधवराव बोथीकर, कैलास वाघमारे, उषाकिरण श्रगारे यांच्यासह सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, बीएलओ, पर्यवेक्षक, तलाठी, मंडळाधिकारी तसेच पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या समन्वित प्रयत्नांतून हे यश साध्य झाले आहे.
सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे गंगाखेड मतदारसंघाने राज्यात अव्वल स्थान मिळविले असून, उर्वरित कामकाजही पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे.
***


