परभणी, ( प्रतिनिधी):- परभणी जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडून पदभार स्वीकारला. संजयसिंह चव्हाण हे नियत वयोमानानुसार आज सेवानिवृत्त झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली. यानंतर अण्णासाहेब चव्हाण यांनी जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारत जिल्हा प्रशासनाची सूत्रे हाती घेतली.
***


