परभणी, (प्रतिनिधी) : भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री शिवाजी भरोसे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा महिला मोर्चा शहर व ग्रामीणच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक, परभणी येथे काँग्रेसचे खासदार डॉ. अंगोमचा बिमोल अकोइजाम यांच्याविरोधातील कथित लैंगिक छळाच्या प्रकरणावरून तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच या प्रकरणावर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
या आंदोलनास भाजपा जिल्हा सरचिटणीस भालचंद्र गोरे, सरचिटणीस मंगलताई मुदगलकर, भाजपा महिला मोर्चाच्या परभणी महानगर जिल्हाध्यक्ष सौ. मनीषा जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सारिका पारवे, रूपाली ठाकरे, दिपाली वाघ, अपर्णा जोशी, प्रभावती अन्नपूर्ण, रोहिणी हलगे, विजया कातकडे, बालिका सुरनार, कीर्ती सिरसागर यांच्यासह महिला मोर्चाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणत या प्रकरणात योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली. (छाया- संजय घनसावंत)


