परभणी,(प्रतिनिधी) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रचनेनुसार माधव नगराच्या वतीने शनिवार 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.15 वाजता वसमत रस्त्यावरील कल्याण नगरातील मारुती मंदिरात विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह आलोक कुमार प्रमुख वक्ते म्हणून, तर उद्योजक अविनाश जयप्रकाश बिहाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विजयादशमी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहा प्रमुख उत्सवांपैकी एक महत्त्वाचा उत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, सामाजिक समरसता, शिस्त, संघटनभावना आणि समाजाप्रती कर्तव्यभावनेचा संदेश दिला जातो. समाजात राष्ट्रीय विचारांची जागृती व्हावी आणि राष्ट्रकार्याप्रती नागरिकांची बांधिलकी अधिक दृढ व्हावी, हा या उत्सवामागील प्रमुख उद्देश आहे. शहरातील नागरिकांनी या विजयादशमी उत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अधिक माहितीसाठी 9422111873 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नगर कार्यवाह अजय हमदापूरकर यांनी केले आहे.
Saturday, October 24
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्ह्यात दुपारी 4 वाजेपर्यंत 61.81 टक्के मतदान :26 हजार 684 मतदारांपैकी 16 हजार 482 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क; उपजिल्हाधिकार्यांची माहिती
- अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सेलूतील अभिनव फूड प्रॉडक्ट्स आणि परभणीतील के. के. बेकर्सचा परवाना निलंबित
- लग्नास नकार देणार्या तरुणीवर कोयत्याने हल्ला करणार्या आरोपीला 3 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा
- लातूरात वाळू, मटका व जुगार अड्ड्यावर पोलीस उप महानिरीक्षक यांच्या पथकाच्या धाडी; 18 इसमांविरुद्ध कारवाई, 62 लाखांचा मुद्देमाल जप्त
- दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी अॅड. माधवराव भोसले यांच्याकडून लाख रुपयांची मदत
- जलपुनर्भरणासाठी शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा- जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांचे आवाहन
- आधार प्रमाणीकरणासाठी चौथी यादी प्रसिद्ध; २ हजार ९८६ शेतकऱ्यांचा समावेश; पात्र शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
- राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धेत एल.के.आर.आर. प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश


