सेलू,(प्रतिनिधी) : सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रवळगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये आयोजित ‘आई महोत्सवा’अंतर्गत महिलांसाठी मंठा देवी दर्शन उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, डीग्रसवाडी, पावडे हादगाव, वाकी, पिंपरुळा, बरसाले डीग्रस आणि शिराळा येथील सुमारे 400 महिलांनी मंठा देवीचे दर्शन घेतले.
गेल्या सात वर्षांपासून या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना देवीच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. दर्शनानंतर महिलांना प्रसादरूपाने फराळाचे वाटप करण्यात येते. तसेच प्रत्येक महिलेला भेटवस्तू दिली जाते. धार्मिक श्रद्धा जपण्यासोबतच महिलांना सामूहिकरीत्या सहभागी करून घेणे, सामाजिक सलोखा वाढविणे आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
आई महोत्सव हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून महिलांना एकत्र आणणारा, त्यांची श्रद्धा दृढ करणारा आणि धार्मिक व सांस्कृतिक परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारा सामाजिक उपक्रम आहे. महिलांच्या सहभागातून हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील, असे डॉ. आदित्य रोडगे यांनी सांगितले. ग्रामीण महिलांना धार्मिक स्थळांच्या दर्शनाची संधी मिळवून देणारा हा उपक्रम श्रद्धा, स्नेह आणि सामाजिक एकात्मता वाढविण्यासह सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
या वेळी जिल्हा परिषद सदस्या डॉ. सविता रोडगे, डॉ. आदित्य रोडगे, पिंपरुळ्याचे सरपंच कंस मानमोडे, अंकुश शेरे, सदाशिव गिरी, लक्ष्मण शेरे, विष्णू मानमोडे, दिगंबर मानमोडे, शिराळा येथील किसनराव खेडेकर, हादगाव येथील सुभाष लोखंडे, विश्वनाथ काष्टे, आबासाहेब काष्टे, विश्वनाथ पावडे, रवी पावडे, शिराळा येथील कुंडलिक खेडेकर, डीग्रसवाडीचे उपसरपंच राहुल गाडेकर, ज्ञानेश्वर होगे, सिद्धीकी पठाण, बद्रि बरसाले, विलास आठवले आदी उपस्थित होते.



