पिकांच्या स्थितीचा घेतला आढावा; शेतकऱ्यांना दिला दिलासा
परभणी, (प्रतिनिधी) – पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर परभणी तालुक्यातील टाकळी कुं. येथे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी आज शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच शेतकऱ्यांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांना दिलासा दिला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीषा माथुर, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, जिल्हा परिषद सदस्य प्रभू जयस्वाल, गटविकास अधिकारी पी. एम. जाधव, तालुका कृषी अधिकारी नांदे, नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर, मंडळ अधिकारी कल्पना शेळगावकर, खाजा काजी, ग्राममहसूल अधिकारी कपिल फत्तेपूरकर यांच्यासह टाकळी कुं येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

***


