शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानचा उपक्रम
सेलू: (प्रतिनिधी) येथील शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सोमवार ( दि.२६) ऑक्टोबर रोजी नूतन विद्यालयाच्या कै.रा.ब.गिल्डा सभागृहात सायंकाळी सहा वाजता अक्षर व्याख्यानमाला आयोजित केली आहे. हे अक्षर व्याख्यानमालेचे सहावे वर्षे आहे. अक्षर व्याख्यानमालेत ‘ मराठी भाषेचे संवर्धन : शासन ,समाज आणि नव्या पिढीची भूमिका ‘ या विषयावर किरण कुलकर्णी ( सचिव, मराठी भाषा आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई ) यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शब्दसह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव लहाने हे असतील. अक्षर व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, डॉ. सुरेश हिवाळे, डॉ. शरद ठाकर, डॉ. सतीश मगर,एकनाथ जाधव, डॉ.अशोक पाठक,डॉ.काशिनाथ पल्लेवाड, मुख्याध्यापक रमेश नखाते, रामराव गायकवाड, रामराव बोबडे, सुभाष मोहकरे, माधव गव्हाणे परिश्रम घेत आहेत.



