परभणी,(प्रतिनिधी) : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त येथील आश्रय सेवाभावी संस्थेच्यावतीने महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशन व परभणी जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने राज्यस्तरीय परभणी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रविवार 29 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. सकाळी 6 वाजता परभणी येथील स्टेडियमवरून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
स्पर्धेत पुरुष खुल्या गटातील 10 किलोमीटर धावण्याच्या शर्यतीसह विविध वयोगटांतील स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. पुरुष खुल्या गटातील विजेत्यास 15 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 10 हजार रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी 7 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धा पूर्ण करणार्या प्रत्येक स्पर्धकाला पदक देऊन सन्मानित करण्यात येणार असून, सर्व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. प्रत्येक गटातील दहा विजेत्या खेळाडूंना किट बॅग देण्यात येणार आहेत.
स्पर्धेसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नोंदणी व नियम-अटींसाठी https://register.smrsports.com/Competition/parbhani_marathon_2026 या संकेतस्थळाला भेट द्यावी. स्पर्धकांचे बिब क्रमांक शनिवार 28 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 ते रात्री 8 या वेळेत वसमत रस्त्यावरील श्री शिवाजी महाविद्यालय कॉम्प्लेक्स येथील आयोजक डॉ. सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांच्या संपर्क कार्यालयात वितरित करण्यात येणार आहेत.
नोंदणीसाठी रणजित काकडे (9423444467), कैलास टेहरे (9860914540) आणि प्रा. डॉ. गुरुदास लोकरे (9421459087) यांच्याशी संपर्क साधावा. ऑनलाइन नोंदणीसाठी अडचण आल्यास यमनाजी भाळशंकर (9730384743), अब्दुल अन्सार (9970996044), गजानन भालेराव (9175743416) आणि अमोल नंद (9307617832) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा समन्वयक प्रा. डॉ. माधव शेजूळ (9422876825) यांच्याशी संपर्क साधावा.


