परभणी2 ( प्रतिनिधी) जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह त्याच्या साथीदारांनी केलेल्या ९ वेगवेगळ्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६ लाख १० हजार ८२६ रुपये किमतीचे सोने आणि रोख रक्कम असा एकूण मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. चिखले आणि पोलीस निरीक्षक श्री. गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हेगारांचा शोध घेत होते. दरम्यान, शहरातील दर्गा रोड परिसरातील जामकर विद्यालय पाठीमागील मैदानात एका पाल टाकलेल्या ठिकाणी एक विधीसंघर्षग्रस्त बालक व त्याची आई लक्ष्मीबाई भोसले हे संशयितरित्या असल्याचे गोपनीय बातमीदारा मार्फत पोलिसांना समजले.
पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धडक देऊन सदर बालकाला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली. तेव्हा त्याने परभणी जिल्ह्यासह जालना जिल्ह्यात आपल्या इतर तीन साथीदारांच्या मदतीने घरफोड्या केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेल्या मालापैकी हिश्याला आलेला मुद्देमाल त्याची आई लक्ष्मीबाई भोसले हिने पालातून दोन पंचांसमक्ष बाहेर काढून दिला. पोलिसांनी बालकासह त्याच्या आईला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी नवामोंढा पोलीस ठाण्यात हजर केले आहे.
या ९ गुन्ह्यांची झाली उकल
या कारवाईमुळे परभणी व जालना जिल्ह्यातील एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत:
- पो.स्टे. नवामोंढा: गु.र.नं. ३१८/२०२६, कलम ३०५(अ), ३३१(३)(४) भा.न्या.सं.
- पो.स्टे. पालम: गु.र.नं. ४४१/२०२६, कलम ३०५(अ), ३३१(३)(४) भा.न्या.सं.
- पो.स्टे. पालम: गु.र.नं. ४८४/२०२६, कलम ३०५(अ), ३३१(३)(४) भा.न्या.सं.
- पो.स्टे. तडकळस: गु.र.नं. २८२/२०२६, कलम ३०५(अ), ३३१(३)(४) भा.न्या.सं.
- पो.स्टे. जिंतूर: गु.र.नं. ४३६/२०२६, कलम ३०५(अ), ३३१(३)(४) भा.न्या.सं.
- पो.स्टे. चारठाणा: गु.र.नं. १८५/२०२६, कलम ३०५(अ), ३३१(३)(४) भा.न्या.सं.
- पो.स्टे. सेलू: गु.र.नं. १२७/२०२६, कलम ३०५(अ), ३३१(३)(४) भा.न्या.सं.
- पो.स्टे. दैठना: गु.र.नं. २९५/२०२६, कलम ३०५(अ), ३३१(३)(४) भा.न्या.सं.
- पो.स्टे. चंदनझीरा (जालना): गु.र.नं. ४३१/२०२४, कलम ३०३(२) भा.न्या.सं सदरची धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक कार्यालय, परभणी अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) चंदनसिंह परिहार, GPSI मधुकर चट्टे, सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, हवालदार केशव लटपटे, लक्ष्मण कांगणे, मुकेश बुधवंत, पांडुरंग तुपसुंदर, नेताजी गीते, सुनील राठोड आणि पोलीस अंमलदार उमेश चव्हाण, विलास बहुरे यांनी पार पाडली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे


