परभणी (प्रतिनिधी) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय परभणी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबीर मौजे वांगे येथे दिनांक 4/02/2025 रोजी सुरुवात केली. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, डॉ. नामदेव आघाव यांनी केले.

महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधीर राजुरकर यांनी युवकांनी समाजसेवा आणि राष्ट्रीय उभारणीत सहभाग घेणे गरजेचे आहे असे सांगितले. डॉ. नामदेव आघाव यांनी पशुसंवर्धन विभाग व पशुवैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पशु लसीकरण व उपचार शिबिराचे आयोजन दिनांक 9 फेब्रुवारी रोजी करण्यात येईल असे सांगितले. या विशेष शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. के. के. खोसे, यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ प्रवीण राठोड, डॉ. संदीप रिंदे, डॉ. तात्याराव रसाळ तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष काळे, पोलीस पाटील सतीश शिंदे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कनले, अर्जुन खनपटे, ज्ञानेश्वर खनपटे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवम खिस्ते व स्फूर्ती चाटे यांनी केले. या शिबिरामध्ये महाविद्यालयातील एकूण 79 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.


