परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयता 12 वी) दि. 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयता 10 वी) दिनांक 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा कालावधीत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच परीक्षा परिसरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 लागू करण्यात येत असल्याचे जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष तथा जिल्हादंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावरील गैरप्रकार टाळण्यासाठी आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणा-या उच्च माध्यमिक, प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) कालावधीत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरात कोणत्याही व्यक्तीस प्रवेश निर्बंध घालण्यात येत आहेत. या सर्व परीक्षा केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश परीक्षार्थी, परीक्षेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक, पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत.
हे आदेश जिल्ह्यातील परीक्षा केंद्रास दिनांक 11 फेब्रुवारी सकाळी 8 वाजेपासून ते 18 मार्च 2025च्या सायंकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील, असेही जिल्हादंडाधिकारी गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


