परभणी (प्रतिनिधी) महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे,अनेक संत आपल्या कार्याने आणि विचाराणे मोठे झाले आहेत,प्रत्यकाने त्यांचे आचार,विचार कृतीमध्ये आणावेत,असे प्रतिपादन प्रदिप रुघे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
जिंतूर रोड वरील दत्तनगर येथील गार्डन मध्ये संत तुकडोजी महाराज,भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. परभणी महानगर पालिकेचे माजी महापौर भगवानजी वाघमारे यांच्या हस्ते तीनही प्रतिमेचे पुष्पहार घालून जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले .याप्रसंगी मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य लड्डा, भागवत शारदा महाविद्यालयाचे प्राचार्य पवार,प्राचार्य पाटील , डॉ.रेवनवार ,डॉ. शिंदे , प्रा.सोंडगे, पंजाबराव देशमुख,डॉ. कान्हेकर,सौ अंजली सुतारे सौ.अर्चना जैन आणि इतर असंख्य सदस्य उपस्थित होते . या परिसरातील सर्वांना फिरण्यासाठी उत्तम गार्डनची निर्मिती वाघमारे यांनी करून दिली त्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले. यानिमित्याने श्भागवत त्यांचा सत्कार केला,त्यासोबतच गार्डन ग्रुप च्या सदस्य या नात्याने सौ अर्चना जैन व प्रदिप रुघे दत्ता मामा यांचा सत्कार वाघमारे साहेबांच्या हस्ते करण्यात आला.पोलीस निरीक्षक म्हणूनआजच सेवानिवृत्त झालेले घाडगे यांचा सुध्दा मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदिप रुघे सर यांनी मानले.