परभणी (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वैभव नगर शाखेत गुरुपौर्णिमेचे आयोजन इ 8 वी जी या वर्गातर्फे करण्यात आले होते.व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे पर्यवेक्षक प्रदिप रुघे तर प्रमुख अतिथी म्हणून उखळकर सर होते.
प्रथम माता सरस्वती आणि व्यास ऋषीमुनी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, व्यासपीठा वर उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकवृंद यांचे औक्षण करून गुरुप्रती आदराची भावना म्हणून पुष्प आणि श्रीफळ देऊन विध्यार्थ्या तर्फे शिक्षकांचा गौरव करण्यात आला.वर्गातील पुष्कळ विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून आणि भित्ती पत्रकातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे अतिथी श्री उखळकर सर यांनी पौरांनीक गोष्टींचा उल्लेख करून गुरुशिष्य परंपरा किती मोठी आहे हे विशद केले तर प्रदिप रुघे सर यांनी गुरुबद्दलआणि जन्म देणाऱ्या आई वडीला बद्दल प्रेम आणि आदर कसा राखता येइल याचे महत्व विशद केले.कार्यक्रमाचे संचलन कु हणेगावकर आणि कु वाहिवल चि आयुष लोनसने व दीपेश लुंगाडे यांनी केले.तर आभार प्रदर्शन कु साची लवांडे हिने केले. शेवटी वर्गशिक्षक श्री महेश दीक्षित सर आणि उत्कृष्ट संचलन करणाऱ्या विद्यार्थीनीचे अभिनंदन करण्यात आले.
यासोबतच इ 5 वी जी वर्गशिक्षिका श्रीमती आलेगावकर मॅडम यंच्या वर्गाकडून सर्व शिक्षकांना रोपटे देण्यात आले.तसेच इ 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विध्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी प्रशाळेतील जेष्ठ शिक्षक कुंडगिर सर, दंडवते सर, पतंगे सर, देशपांडे सर, गमे सर, वानरेसर, गायकवाड सर, दीक्षित सर,श्रीमती आलेगावकर मॅडम, कंधारकर मॅडम,हाके मॅडम,गुडेवार मॅडम,देशमुख मॅडम,पैंजने मॅडम तसेच सर्व विध्यर्थी उपस्थित होते.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


