परभणी, (प्रतिनिधी)ःशहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री जय हिंद गणेश मंडळाच्या वतीने गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी सायंकाळी श्री कुबरेश्वर धाम येथील पवित्र रुद्राक्षाचे वाटप आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
श्री जय हिंद गणेश मंडळाच्या वतीने रुद्राक्ष वाटपासाठी 3 सप्टेंबर पर्यंत नोंदणी करण्यात आली होती. नोंदणी टोकन असणाऱ्यांना रुद्राक्षाचे वाटप करण्यात आले.चार सप्टेंबरला सायंकाळी यशवाडी संस्थानचे महंत श्री स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यांच्या हस्ते रुद्राक्ष वाटप करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील,शिवसेना सह संपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक अंबिका डहाळे,संजय गाडगे,श्री जय हिंद गणेश मंडळाचे प्रेरणास्थान अनिल डहाळे, ज्ञानेश्वर पवार,बाळराजे तळेकर,प्रमोद सोनी,कमलकिशोर अग्रवाल,सुनील मुथा बापू तावडे, शंकर देशमुख,बंडू नाना बिडकर,प्रल्हाद देवडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष विशू डहाळे अमित पाचलिंग विशाल डहाळे भूषण टेहरे शैलेश डहाळे सुरज सोळुंके सागर पातुरकर पवन डहाळे आकाश डोंगरे शुभम टेहरे जबरेश्वर डहाळे आर्यन उडान सुमित जाधव रुद्र खोतकर श्रीकांत गुंडाळे गोटू साखरे शुभम कुरुडे व्यंकटेश कोंडावार संकेत शहाणे गणेश टाक अमोल व्यास तेजस पैठने सुजित कुलथेआदींनी यावेळी परिश्रम घेतले.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


