परभणी (प्रतिनिधी) येथील शहरातील राष्ट्रीय महामार्ग मुख्य रस्ता NH61 हा जातो. या रस्त्यावरील शहरातील बसस्थानक लगतच्या उड्डाणपूलावरील फूटपाथ परभणी जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक साहेब यांनी अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे रस्ता रुंद असल्या कारणाने काढून टाकले आहे. परंतु कित्येक महिन्यांपासून सध्या शहरात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, फूटपाथ काढल्यानंतर उड्डाणपूलावरील रस्त्यावर खड्डे तयार झाले आहेत. त्यामुळे आधीपेक्षा सध्याच्या स्थितीत अपघाताचे प्रमाण जास्त वाढले आहे. लवकरात लवकर शहरातील या उड्डाणपूलावरील रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी. यानंतर या रस्त्यावर जेवढे अपघात होतील, त्याला आपल्या सह परभणी जिल्ह्यातील परभणी लोकसभा खासदार, पोलीस अधीक्षक हे सर्वस्वी जबाबदार असतील, असे पॅंथर परिवर्तन चळवळीचे संस्थापक अध्यक्ष सिद्धार्थ पानबुडे यांनी सांगितले.
येत्या महिन्याभरात या रस्त्याचे काम न झाल्यास परभणी शहरातील हजारो नागरिकांसह बेमुदत उड्डाणपूलावर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा पॅंथर परिवर्तन चळवळीचे सिद्धार्थ पानबुडे यांनी निवेदना द्वारे देण्यात आला. निवेदनात बोधिसत्व साळवे, रितेश देशमुख, पंडित गायकवाड, ज्ञानेश्वर लेवडे, सागर पानबुडे, विक्रांत जोगदंड, सुधांशू कुरील, विनायक शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


