परभणी (प्रतिनिधी) आज साळापुरी येथे भारतीय जैन संघटना एवं सकल जैन समाज परभणी द्वारा परभणी तालुक्यातील साळापुरी येथील पूरग्रस्त बाधित 30 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू जसे कपडे, ब्लँकेट,शर्ट, पॅन्ट व किराणा सामान च्या 30 किट वाटप करण्यात आल्या.
जैन समाजातील सर्व समाजबांधव यांनी जीवनावश्यक वस्तू, खाण्या पिण्यासाठी लागणारे सामान, ब्लँकेट, किराणा सामान , ज्यांना जसे जमेल तशी दानराशी पण संघटने कडे जमा केली.
यावेळी प्रत्येक महिलेला साडी, गर्भवती महिलांना त्याच्या व्यथा प्रत्यक्ष जाणून घेतल्या. त्यांचे धाडस बांधविले. जीवन जगण्याचे सामर्थ्य व प्रेरणा दिली. दुसऱ्या राज्यातून आलेले 5 आदिवासी परिवार यांच्या पण अडचणी जाणून घेतल्या व त्यांना पण किट चे वाटप केले.
*यावेळी परभणी भारतीय जैन संघटने चे सर्व पदाधिकारी, सकल जैन समाजा चे पदाधिकारी व समाज बांधव,साळापूरी गावाचे सरपंच , उपसरपंच,गावकरी आदी उपस्थित होते*


