परभणी,( प्रतिनिधी) ) : परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी दि. १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान तहसील कार्यालय परभणी, तहसील कार्यालय सेलू, उपविभागीय अधिकारी कार्यालय, गंगाखेड आणि तहसील कार्यालय पाथरी येथे मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार मतदान केंद्रांच्या ठिकाणांपासून १०० मीटर परिसराच्या आतील सर्व पक्षांची कार्यालये, उमेदवारांचे मंडप, दुकाने, फेरीवाले, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहने तसेच पक्ष किंवा उमेदवारांच्या चिन्हांचे प्रदर्शन यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच निवडणूक कामाव्यतिरिक्त इतर व्यक्तींना या परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश दि. १७ जून २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लागू राहणार आहेत. असे जिल्हादंडाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जारी केलेल्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.
*-*-*-*-*
Sunday, November 22
ताज्या बातम्या:
- खा. रामराव वडकूते यांचे नवी दिल्लीत अल्पशा आजाराने निधन
- दामपुरी येथून ५ लाखांची बोलेरो पिकअप चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
- विशेष लोकअदालतीत 32 प्रकरणे निकाली : धनादेश अनादर प्रकरणांतून 28 लाख 96 हजार 806 रुपयांची वसुली; 21 नोव्हेंबर रोजी आयोजन
- कौसडीच्या सचिन अरुण गिरी यांना पीएच.डी. पदवी प्रदान गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
- राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
- परभणीतील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकाऱ्यांकडे AIYF चे सविस्तर निवेदन!
- संत तुकाराम महाविद्यालयात उद्या हभप बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन; स्व. अॅड. शेषरावजी भरोसे (आबा) यांच्या 17 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात बसच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू ; दुसरा जखमी


