परभणी,(प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून तुकाराम मुंडे यांच्या ऐवजी ग्रामविकास पंचायतराज विभागातील सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव हेमंत महाजन यांनी आज मंगळवार 23 जून रोजी एका अध्यादेशाद्वारे नव्या पालक सचिवांची नियुक्ती केली. तुकाराम मुंडे हे या जिल्ह्यात पुर्वी पालक सचिव म्हणून नियुक्त केल्या गेले होते. परंतु, नियुक्तीपासून ते आजतागायतपर्यंत ते या जिल्ह्यात दाखल झालेच नाहीत. आज ना उद्या ते येतील म्हणून या जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तूळाचे त्यांच्या दौर्याकडे लक्ष लागले होते. दुर्देवाने मुंडे यांच्या नियुक्तीपासूनच्या पहिल्या दौर्यापूर्वीच सामान्य प्रशासन विभागाने डॉ. पुलकुंडवार यांच्या नियुक्तीचा आदेश दिला.
यज्ञटंट्
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


