परभणी, (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टी, परभणी महानगर यांच्या वतीने हॉटेल चतुर्थी, परभणी येथे ‘मोदी सरकारची १२ वर्षे – विश्वास, विकास व जनकल्याण’ तसेच २५ जून ‘काळा दिवस’ निमित्त लोकतंत्र सेनानी सत्कार कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् व महाराष्ट्र गीताने करण्यात आली. त्यानंतर आणीबाणी व मोदी सरकारची १२ वर्षे या विषयावरील प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे यांनी केले. प्रमुख वक्ते श्री. मनोज पांगारकर यांनी १९७५ च्या आणीबाणीच्या काळात लोकशाहीवर झालेल्या आघाताचा, संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी लोकतंत्र सेनानींनी दिलेल्या संघर्षाचा इतिहास प्रभावीपणे उपस्थितांसमोर मांडला. अभियानाच्या संयोजिका सौ. मंगलताई मुदगलकर यांच्या नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी श्री विजय नागनाथ जोशी, श्री भास्कर गोपाळ ब्रम्हनाथकर, श्री सुभाष सखारामपंत महाजन, श्री सुधाकर भीमाशंकर चिद्रवार, श्री भागोराव सखाराम सोनुने, श्री पृथ्वीराज जाधव, श्री रामराव राजारामजी जाधव, श्री लक्ष्मीकांत देविदास पांडे, श्री हरेंद्र किशनराव कुताबादकर, श्री भाऊद्दीन रहेमान अली, श्री कृष्णा नारायणराव लंगर, श्री गंगाधर नारायणराव जाधव, श्री लक्ष्मणराव तात्याराव शेरे, श्री किशन गणेश चमकुरे, श्री भाऊराव मुंजाजी वावरे, श्रीमती अंजली दिलीप देशपांडे, श्रीमती संजीवनी श्रीरामपंत बुद्रुककर, श्री अशोक आबाजी वाकडे, श्री सुभाष जाधव, श्री नियाज खान, श्री दादाराव देशमुख, श्री सुभेदार संभाजी कुबडे, श्री संभाजी पांडुरंग कुबडे, श्री प्रकाश हनुमंतराव राजेंद्र, श्रीमती कांताबाई दादाराव मगर, श्रीमती दगडूबाई नारायण टाळकुटे, श्रीमती सुमनबाई राजेंद्र गुरडे व श्रीमती शांताबाई नानासाहेब जाधव या लोकतंत्र सेनानींचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास लोकतंत्र सेनानी, मान्यवर, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.


