परभणी (प्रतिनिधी) मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वर्धापन दिनानिमित्त 26 जुलै 2026 रोजी येथील शुभमंगल मंगल कार्यालयात मराठवाड्यातील उद्योजक व नवीन उद्योग करणाऱ्यांना युवकांना मार्गदर्शन व्हावे यासाठी उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध उपक्रम राबवले जातात याचाच एक भाग म्हणून मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वर्धापन दिनानिमित्त शुभमंगल मंगल कार्यालय पाथरी रोड परभणी येथे सकाळी दहा वाजता मराठवाडा विभागीय उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पालकमंत्री सौ.मेघना साकोरे (बोर्डीकर) तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकार मंञी बाबासाहेब पाटील तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध उद्योजक जितेंद्र जाधव हे राहणार आहेत .
यावेळी मराठा प्रवाह च्या वतीने सहकार व उद्योग ही स्मरणिका प्रकाशित केली जाणार आहे. या ठिकाणी विविध व्यवसायाचे स्टॉल लावले जाणार आहेत. या उद्योग परिषदेत सहभाग नोंदविण्यासाठी कोणतीही फीस आकारले जाणार नसून ही विनामूल्य उद्योग परिषद राहणार आहे.
या उद्योग परिषदेचा समाज बांधवांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन भविष्यात आपणही यशस्वी उद्योजक होऊ शकतो हे दाखवण्याची संधी निर्माण करून दिली जाणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धाराजी भुसारे यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्या स्थापन करून कार्यक्रम यशस्वी केला जाणार आहे. या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे अहवाल जिल्हा समन्वयक बाळासाहेब पवार (परभणी), गंगाधर लोंढे (हिंगोली ),शिवाजी शिंदे (नांदेड) ,अभिजीत कदम (लातूर) ,रामकृष्ण देशमुख (धाराशिव), विजय गायकवाड (बीड), धनंजय देशमुख (जालना )सुभाष भोसले (संभाजीनगर) यांनी केले आहे.


